ETV Bharat / state

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर, 'हे' आहे मुख्य कारण - Naresh Goyal Bail Case - NARESH GOYAL BAIL CASE

Naresh Goyal Bail Case : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यांनी कॅनरा बॅंकेची फसवणूक केली, असा आरोप आहे. त्यांना कर्करोग झाला असल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात गोयल यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता.

Naresh Goyal Bail Case
नरेश गोयल (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 8:18 PM IST

मुंबई Naresh Goyal Bail Case : न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी नरेश गोयल यांची याचिका अंशत: मंजूर करत 2 महिन्यांसाठी त्यांना जामीन मंजूर केला. नरेश गोयल यांच्या जामीनावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. कॅनरा बॅंक फसवणूक प्रकरणी त्याच्यावर न्यायालयात खटला चालू आहे.

गोयल यांच्या संदर्भातील निर्णय राखून : आज सोमवारी (6 मे) हा निर्णय देण्यात आला. गोयल यांचे वकील आबाद पोंडा यांनी कॅश बेलसाठी विनंती केली; मात्र न्यायालयाने त्यांची विनंती नाकारली. ईडीतर्फे हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली होती. गोयल यांच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर देखील कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यासमोर गोयल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आणि सोमवारी हा निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले होते.

कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक : कॅनरा बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी 75 वर्षीय उद्योजक नरेश गोयल मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली अटकेत आहेत. त्यांच्यावर कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

गोयल यांच्या वकिलाचा युक्तिवाद : गतवर्षी गोयल दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. नरेश गोयल यांना ईडीने गतवर्षीच्या 1 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. अनिता गोयल यांच्या आजारपणामुळे त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. तर, गोयल यांच्यावर सध्या मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात गोयल यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता; मात्र त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची त्यांना परवानगी दिली होती. नरेश गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी ऑनलाईन युक्तिवाद करत मानवतेच्या आधारावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. आजारपणामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक दुर्बलतेसोबतच मानसिक दुर्बलता वाढू लागली आहे आणि ते जास्त गंभीर असल्याचा युक्तिवाद साळवे यांनी केला होता.

उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यास विरोध नाही : उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात गोयल यांच्या जामीनाला विरोध केला होता. तपास यंत्रणा ईडीतर्फे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली होती. त्यांनी जामीनाला जोरदार विरोध केला होता. अटकेत असताना गोयल यांना उपचारांसाठी रुग्णालयात ठेवण्यास आपला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. गरज भासल्यास त्यांना उपचारांसाठी आणखी एक महिना रुग्णालयात ठेवण्यास देखील ईडीचा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

ईडीची छापेमारी आणि झडती : नरेश गोयल न्यायालयीन कोठडीत असताना उपचार घेणे आणि बाहेर राहून उपचार घेणे यामध्ये फरक असल्याचे मत दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायमूर्तींनी व्यक्त केले होते. मात्र, गोयल हे सध्या त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्यावर कोणतेही बंधन नसल्याचे वेणेगावकर यांनी स्पष्ट केले होते. जेट एअरवेजला देण्यात आलेल्या क्रेडिट मर्यादा आणि कर्जाच्या 848.86 कोटी रुपयांपैकी 538.62 कोटी रुपये थकीत आहेत. सीबीआय आणि ईडीने गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यालयांवर छापेमारी करून झडती घेतली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024 : मोदी की गादी, नणंद की भावजय; जाणून घ्या उद्या कोणत्या दिग्गजांमध्ये रंगणार सामना - Lok Sabha Elections 2024
  2. नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024
  3. शरद पवारांची प्रकृती बिघडण्यामागचं 'हे' आहे खरं कारण, "4 तासांची झोप अन्...", नेमकं काय म्हणाले रोहित पवार? - Sharad Pawar Health

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.