पुणे Jayant Patil On Param Bir Singh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. महाविकास आघाडीचं सरकार असताना मी 100 कोटी वसुलीबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे तसंच जयंत पाटील यांना भेटायला गेलो. मात्र, त्यांनी याकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
त्यांना सांगायचा प्रश्नच उद्भवत नाही : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा पुण्यातील हडपसर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. परमबीर सिंग यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते जे काही बोलत आहे ते मला मान्य नाही. मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का? माझी आणि परमबीर सिंग यांची भेट फारशी झालेली नाही. त्यामुळे मी त्यांना काही सांगायचा प्रश्नच उद्भवत नाही."
राज ठाकरेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही : राज ठाकरे यांनी आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता ते म्हणाले, "मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. सल्ला मानून काम करत नाहीत, मला वाटतं यात कुठलंही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्यानं घेण्याची गरज नाही." असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलं.
सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाही : महिंद्रा कंपनीचा नाशिक येथील एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, "गुजरातला काही जाणार असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचं सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाहीत. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प तिकडे गेले आहेत. आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने प्रकल्प दुसर्या राज्यात जाऊ नये यासाठी काहीच केलं नाही."
हेही वाचा
- "निकालाच्या दिवशी महाविकास आघाडी फुटणार", आशिष शेलार यांचा दावा - Ashish Shelar On Mahavikas Aghadi
- "मुंबईत येऊन...", मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा - Manoj Jarange Patil
- राष्ट्रवादीच्या बॅनरवर रोहित पवारांचा फोटोच नाही, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... - Supriya Sule On Sharad Pawar
- "हा तर, चिंधीचोर नेता"; खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सुषमा अंधारेंची जहरी टीका - Uddhav Thackeray