मिरा भाईंदर Jagadguru Rambhadracharya : पद्मभूषण रामभद्राचार्य महाराज यांच्या हस्ते मंगळवारी मीरारोड येथे श्री गंगोत्री उत्तर भारतीय भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं सांगितलं. आमदार गीता जैन यांना महायुतीकडून तिकीट मिळावं, यासाठी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा कार्यक्रम : मीरा-भाईंदर शहरातील उत्तर भारतीयांची वाढती संख्या पाहता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय भवन येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरू श्रीराम भद्राचार्य महाराज म्हणाले की, आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यावं यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजेत. महायुतीकडून आमदार गीता जैन यांना तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पाच वर्षांनी नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जागेबाबत वाद : उभारण्यात येणाऱ्या भवनाच्या बांधकामाला परवानगी देण्यास एका व्यावसायिकानं मनपाकडे आता तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे या जागेवर वाद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सदरची जागा ही माझे भाऊ सुनील जैन यांच्या नावे असल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली. मिरारोड पूर्वेकडील पुनम गार्डन जुना सर्वे नंबर 456(1),459(1) या जागेवर प्रस्तावित आहे. व्यावसायिक नरेश शाह यांनी सांगितलं की, 2007 मध्ये या जागेवर इमारतीचा नकाशा मंजूर करण्यात आला. एन. ए. दाखला, वीज जोडणी देखील माझ्या नावे असून सदरची जमीन ही माझी असून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या जागेवर 2020 रोजी आमदार गीता जैन यांचे निकटवर्तीय सुनील जैन यांनी जबरदस्ती जागेवर कब्जा केला. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यावेळी स्थानिक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार देखील केली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांची बदली करण्यात आलेली.
उत्तर भारतीयांची फसवणूक : 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी जाहीर सभेत मी निवडून आल्यास स्वखर्चानं उत्तर भारतीय भवन उभारणार असल्याचं जाहीर केल होत. मात्र निवडून आल्यानंतर मागचे पाच वर्ष उलटून गेल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करून उत्तर भारतीयांची फसवणूक करत असल्याचं माजी नगरसेवक मदन सिंग म्हटलंय. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारान महापालिकेमार्फत हिंदी भाषिक भवन उभारल जात आहे, त्यात आमदार गीता जैन यांच्याकडून उत्तर भारतीय भवन उभारत असल्यानं स्थानिक लोकप्रतिनिधी प्रांतवाद करत आहे. यावर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप नोंदविण्यात आलाय.
हेही वाचा
- 'लाडक्या बहिणी'चा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? किती कोटी खर्च - Ladki Bahin Yojana
- राज्यात महायुतीच्या १५० ते १६० जागा निवडून येणार रामदास आठवले यांचा दावा - Athawale claims
- जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही तरी तोडगा काढतील, अतुल सावे यांचा विश्वास - Jarange Patil Hunger Strike