ETV Bharat / state

Womens Day 2024 : एचआयव्ही बाधित असूनही शालिनीताई बनल्या आधारवड, वाचा प्रेरणादायी स्टोरी - International Women Day 2024

International Women Day : एचआयव्ही बाधित असल्यामुळं आलेले अनुभव आणि समाजानं दिलेल्या वागणुकीमुळं कोल्हापुरातील एका महिलेनं परिस्थितीवर मात 'जाणीव' संस्थेची स्थापना केलीय. या संस्थेमार्फत एचआयव्हीग्रस्तांसाठी काम केलं जातं.

International Women Day
International Women Day
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 11:19 AM IST

Updated : Mar 8, 2024, 12:00 PM IST

कोल्हापूर International Women Day : समाजानं वाळीत टाकलं, कित्येकदा आत्महत्येचा विचार मनात आला, पण 'ती' हरली नाही. ती जिद्दीतून आपल्यासारख्याच घटकांचा विचार करून एक महिला कोल्हापुरात उभी राहिली. समाजातील गरजूंचा आधार बनली. तिला एचआयव्ही या जीवघेण्या आजारानं ग्रासलं असलं, तरी ती गरजू, निराधार एचआयव्हीग्रस्तांसाठी आधारस्तंभ बनली आहे. कोल्हापुरातील शालिनीताई (नाव बदलेलं आहे) यांच्या कर्तृत्वाची ही गोष्ट आहे.

बिकट परिस्थितीवर केली मात : शालिनीताई 'या' मूळच्या कर्नाटकातील त्या करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथं वास्तव्यास आहेत. ज्या आजारात माणूस खचून जातो, आपलं सर्वस्व गमावून बसतो, त्याच आयुष्यात शालिनीताई कित्येकांच्या आदर्श बनल्या आहेत. 2000 साली शालिनीताईंचं लग्न झालं. त्यांच्या संसाराला चांगली सुरुवात झाली. या वेलीवर आता फुलं उमलतील, आपलं आयुष्य या फुलांच्या सुगंधानं दरवळून जाईल, असं वाटत असतानाच त्यांच्या आयुष्यात गडद काळोख पसरला. लग्नानंतर काही वर्षातच त्यांना कळालं त्यांना एचआयव्ही आजाराची लागण झालीय. पतीकडून मिळालेला हा शाप त्यांनी नशिबाचा भाग म्हणून स्वीकारला. त्यानंतर ना कुणी जवळ केलं, ना कुणी साधी विचारपूस केली. अशा बिकट परिस्थीतीतसुद्धा त्यांनी पतीची साथ सोडली नाही. दिवसरात्र त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं. मात्र, 2009 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर जगात शालिनीताई एकट्या पडल्या. त्यांच्या पतीला स्मशानभूमीत घेऊन जाण्याइतकीसुद्धा माणुसकी शिल्लक उरली नव्हती, ही खंत आजही त्यांच्या मनाला सलत आहे.

दागिने विकून जमीन घेतली : समाजाच्या अशा कठोर वागणुकीचे चटके शालिनीताई बसत होते. त्यांना वाटत होतं की, समाज पुढं समजावून घेईल. कारण हा आजार संसर्गजन्य नाही. फक्त लैंगिक संबंधातूनच नाही, तर इतर गोष्टीमुळंसुद्धा होऊ शकतो. मग रक्त चढवणे, एकमेकांना तीच सुई वापरणे, टॅटू काढणे, अशा कितीतरी गोष्टी आहेत. आपल्यासारख्याच खचलेल्या जीवांचे आधार बनावं, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी 2010 साली कर्नाटकातील गाव सोडून त्यांनी कोल्हापूरात गाठलं. इथं पण कुणाची साथ नव्हती, पण हार मानली नाही. लढणं हे आपल्या नशिबी आहे. कारण तेवेढ बळ आपल्याजवळ आहे. या विचारानं त्या लढत गेल्या. समाजाचे वाईट अनुभव पाठीशी होताच. यातूनच त्यांनी एचआयव्ही बधितांसाठी 2011 मध्ये जाणीव फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. विशेष म्हणजे ही कोल्हापूर जिल्ह्यातील अशाप्रकारची पहिलीच संस्था ठरली. पुढं त्यांच्यासारख्या भगिनी एकत्र येत गेल्या. आज शालिनीताई अनेकांच्या आधारवड बनल्या आहेत. या सगळ्यासाठी पहिली गरज राहण्याची होती. यासाठी त्यांनी आपले सगळे दागिने विकून कोल्हापूरातील दऱ्याचे वडगाव इथं चार गुंठे जागा विकत घेतली.

माहेर प्रतिज्ञाची स्वप्नपूर्ती : संस्थेसाठी जागा घेतली, पण त्यावर घर कसं कसं बांधव? कारण त्यांच्याकडं काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. मग अशावेळी एक देवदूत त्यांच्या मदतीला धावला. त्यानंतर त्यांच्या 'माहेर प्रतिज्ञा' या घराची स्वप्नपूर्ती झाली. या जागेवर इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशांत जोशी यांनी प्रयत्न केले. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लाईव्ह फेसबुक गाण्याच्या मैफिलीच्या लोकवर्गणीतून निधी उपलब्ध करून दिला. या जागेवर उभी राहिलेली इमारत एड्सग्रस्त महिलांसाठी 'माहेर' व्हावे, अशी भावना असल्याचं शालिनीताई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

हे वाचलंत का :

Last Updated : Mar 8, 2024, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.