नवी दिल्ली : इंडिया आघाडीत पुन्हा एकमत नसल्याचं समोर आलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे. त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला हा मोठा झटका मानला जातोय. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी स्वबळावर राज्यात निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
तृणमुलचं एकटा चलोरे : काँग्रेसकडून तृणमुल काँग्रेसचा प्रस्ताव पेटाळला. त्यानंतर हा निर्णय घेतला असं ममता बॅनर्जी यांच्याकडून सांगण्यात आलं. टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन वादविवाद सुरू होते. मात्र, त्यांच्यामध्ये एकमत झाल नाही. ज्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही, त्यावेळी तृणमुलने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली अशी चर्चा सुरू झालीय. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत.
-
"No alliance in Bengal" says Mamata Banerjee, big dent to INDIA bloc hopes
— ANI Digital (@ani_digital) January 24, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/DU738VyQ76#MamataBanerjee #WestBengal #Indian pic.twitter.com/BYm7ZJ9jhL
">"No alliance in Bengal" says Mamata Banerjee, big dent to INDIA bloc hopes
— ANI Digital (@ani_digital) January 24, 2024
Read @ANI Story | https://t.co/DU738VyQ76#MamataBanerjee #WestBengal #Indian pic.twitter.com/BYm7ZJ9jhL"No alliance in Bengal" says Mamata Banerjee, big dent to INDIA bloc hopes
— ANI Digital (@ani_digital) January 24, 2024
Read @ANI Story | https://t.co/DU738VyQ76#MamataBanerjee #WestBengal #Indian pic.twitter.com/BYm7ZJ9jhL
आम्हाला सांगण्यात आलेलं नाही : काँग्रेस पक्षासोबत माझ कुठलीही चर्चा झाली नाही, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ''पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय. आमची एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे'' असं त्या म्हणाल्या. ''आम्ही स्वबळावर भाजपाला हरवू शकतो. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण त्याबद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही'' असंही त्या म्हणाल्या आहेत.
चर्चा कुठे फिस्कटली? : जागा वाटपावरुन काँग्रेस आणि टीएमसीमध्ये एकमत झालं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून 10 ते 12 जागांची मागणी करण्यात येत होती. पण टीएमसी केवळ दोन जागा द्यायला तयार होती. काँग्रेसला हे मान्य नव्हतं. याच गोष्टीमुळे चर्चा फिस्कटली. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बहरामपूर आणि मालदा दक्षिण या दोन जागा जिंकल्या. त्या दोन जागांची टीएमसीकडून मागणी सुरू होती. पण काँग्रेस त्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेस राज्यातील सर्व 42 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, हे जाहीर केलं.
हेही वाचा :
2 मल्लिकार्जुन खरगेंना 'इंडिया' आघाडीचं नेतृत्व मिळाल्यानंतर काय म्हणाले शरद पवार?
3 वंचितचा इंडिया आघाडीत अद्याप समावेश नाही, तरीही वंचित 'इंडिया'त येण्यासाठी आग्रही