ETV Bharat / state

महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी; आशिया खंडातील 'इतक्या' मीटर उंच शिखरावर फडकवला तिरंगा - Mountain climbers

Mountain climbers : आशिया खंडातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एल्ब्रूस' बेस कॅम्प सर करत भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी साजरा केला. या गिर्यारोहकांच्या टीमनं 11 ऑगस्ट रोजी रशियातून मोहिमेला सुरुवात केली. पाच दिवस गिर्यारोहण करत 18 हजार 510 फूट म्हणजेच 5 हजार 642 मीटर अंतर कापलं.

Mountain climbers
गिर्यारोहकांनी 'माऊंट एल्ब्रूस बेस कॅम्प'वर तिरंगा फडकवला (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 4:11 PM IST

Updated : Aug 16, 2024, 4:28 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Mountain climbers : 360 एक्सप्लोररमार्फत 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं आशिया खंडातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एल्ब्रूस' बेस कॅम्पवर गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवून राष्ट्रीय उत्सव साजरा केला. गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील या टीमनं भारतीय राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायलं. टीममध्ये छत्रपती संभाजीनगर येथून दत्ता सरोदे, प्रशांत काळे, किशोर नवकर, विनोद विभुते, सुरज सुलाने, रुपाली कचरे, मैसूर येथील प्रीत केएस, लातूर येथील अजय गायकवाड, सोलापूर मधील आनंद बनसोडे, मध्यप्रदेश येथील चेतन परमार आणि 12 वर्षीय प्रीती सिंग यांचा समावेश होता.

गिर्यारोहकांनी 'माऊंट एल्ब्रूस बेस कॅम्प'वर तिरंगा फडकवला (Source - गिर्यारोहक)

रशियातून मोहिमेला सुरुवात : छत्रपती संभाजीनगर शहरातील सहा गिर्यारोहकांनी या अनोख्या मोहिमेत सहभाग घेतला. 8 ऑगस्ट रोजी युवक आशिया खंडातील सर्वात उंच शिखर 'माऊंट एल्ब्रूस' सर करण्यासाठी रवाना झाले. 11 ऑगस्ट रोजी रशिया येथून त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. पाच दिवस गिर्यारोहण करत 18 हजार 510 फूट म्हणजेच 5 हजार 642 मीटर अंतर कापलं. मात्र वातावरण खराब असल्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. बेस कॅम्पवर पोहचताच सर्व गिर्यारोहकांनी देशाचा तिरंगा ध्वज हातात घेत 'भारत माता की जय' असा जयघोष केला. तसंच राष्ट्रगीत म्हणून स्वतंत्रता दिवस साजरा केला. तर ही मोहीम फत्ते करणारे महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक ठरले असल्याचा दावा या गिर्यारोहकांनी केलाय. बेस कॅम्पवर त्यांनी महाराष्ट्र गीत गायलं. 16 ऑगस्ट रोजी पुढील अंतिम टप्पा पूर्ण करण्यास सुरू केल्याची माहिती गिर्यारोहक डॉ. प्रशांत काळे यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.

शिखर सर करण्यासाठी आधीपासूनच तयारी : आशिया खंडातील सर्वात मोठे शिखर सर करण्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. रोज नियमित व्यायाम, तिथल्या वातावरणाला अनुकूल अशी तयारी करण्यात आली. महाराष्ट्रातील हा समूह 8 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातून रवाना झाला. या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उत्सवामुळे 360 एक्सप्लोरर समूहानं पुन्हा एकदा साहस आणि देशभक्ती यांचं उत्तम उदाहरण सादर केलं. यापूर्वी मागील वर्षी 11 ऑगस्ट रोजी या टीमनं रशियातील मलिब्डेन शिखरावर 12 हजार फूट उंचीवर यशस्वी चढाई केली होती, अशी माहिती गिर्यारोहकांनी दिली.

हेही वाचा

  1. स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करताना 1350 विद्यार्थ्यांची मानवी साखळी, भंडारदरा धरणाच्या भिंतीवर तिरंगा - independence day Ahmednagar
  2. 'ऐ मेरे वतन के लोगों' गीत अजरामर, संगीतकार सी. रामचंद्र यांचं जन्मगाव मात्र दुर्लक्षित - Independence Day 2024
  3. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीचे 5 विश्वविक्रम; पालकांनी काय केल्यानं ही किमया झाली? - Kanak Mundada

Last Updated : Aug 16, 2024, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.