ETV Bharat / state

हिरेन भगतच्या पोलीस कोठडीत वाढ; कर्नाटक बँकेत पोलिसांना सापडलं घबाड, कोर्टात केला 'हा' दावा - Omkar Developers

Mumbai Crime News : मूलचंद वर्मा यांच्याकडून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने सहा जणांना अटक केली. याप्रकरणी पोलिसांना कर्नाटक बँकेत 7.19 कोटी, 67 लाख भारतीय चलन, 56.96 विदेशी चलन आणि महागडी घड्याळे आणि अनेक करार आढळून आले आहेत.

Mumbai Crime News
कर्नाटक बँकेत पोलिसांना सापडले घबाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 8:48 AM IST

Updated : Feb 7, 2024, 10:12 AM IST

मुंबई Mumbai Crime News : हिरेन रमेश भगत उर्फ रोमी भगत या कथित खंडणी प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय. या आरोपीनं इतर पाच जणांसह मुंबईच्या विकासकाकडून 164 कोटींची खंडणी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पुन्हा आज न्यायालयात हजर केलं असता त्याच्या पोलीस कोठडीत 12 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आलीय.

आरोपीला केली अटक : मुंबईतील नामांकित बांधकाम व्यवसायिका विरोधात दाखल आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार मागं घेण्याच्या नावाखाली आणि बांधकाम व्यावसायिका विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या तपासात मदत करण्याच्या नावाखाली १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने हिरेन भगत (वय ४६) नावाच्या आरोपीला अटक केली. सामाजिक कार्यकर्ता असल्याचा आरोपीचा दावा असून त्यानं बांधकाम व्यावसायिकांकडून २५ लाख रुपये देखील उकळल्याचं तपासात समोर आलं. मंगळवारी आरोपी दिल्लीवरुन मुंबईला आला असता, गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने त्याला अटक केली. या प्रकरणात ही सहावी अटक असून या आधी देखील अश्या प्रकारे आणखी कोणाकडून भगतनं खंडणी वसूल केली आहे का? याचा गुन्हे शाखा कक्ष ९ तपास करत आहे.

१३.६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त : "मुंबई शहरातील सुप्रसिद्ध विकासकाच्या तक्रारीवरून, गुन्हे शाखेनं पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत भगतचं नाव पुढं आले. भगत याचं नाव समोर येताच पोलिसांनी त्यास अटक करुन त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला. भगतच्या घरावर आणि संबंधित ठिकाणी छापे टाकून गुन्हे शाखेनं १३.६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली," अशी माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिली.

पोलिसांना बँकेत सापडले घबाड : पोलिसांनी न्यायालयात दावा केला आहे की, झडती दरम्यान त्यांना त्यांच्या बहिणीच्या नावावर कर्नाटक बँकेत दोन बँक खाती सापडली असून त्या खात्यात 7.19 कोटी, 67 लाख भारतीय चलन, 56.96 विदेशी चलन आणि महागडी घड्याळे आणि अनेक करार आढळून आले आहेत. त्याशिवाय त्याच्याकडून अंधेरी शाखेतून ३ लाख भारतीय चलन, ४.६६ लाख विदेशी चलन आणि विविध प्रतिज्ञापत्रे जप्त करण्यात आली आहेत.

कथित खंडणी प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक केली आहे. भगतच्या घराची झाडाझडती घेतली असता एक शस्त्र पोलिसांच्या हाती लागले आहे - राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त

घरात सापडली तीन शस्त्रे : गुन्हे शाखेने आज न्यायालयाला सांगितलं की, भगतच्या घराची झडती घेतली असता तीन शस्त्रे सापडली आहेत. ज्यात ऑटोमॅटिक मशीनगन एमपी पाच आहे. त्यावर भगत याच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, भगतकडे या सर्व शस्त्रांची नोंदणी असून कायदेशीर परवानाही आहे.

हेही वाचा -

  1. ईडीच्या नावाखाली वसुली करणारी महायुतीतील ती व्यक्ती कोण?- अतुल लोंढे
  2. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीनं घेतलं ताब्यात; चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री
  3. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन 5 दिवसांच्या ईडी कोठडीत

Last Updated : Feb 7, 2024, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.