ETV Bharat / state

राज्यात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर; मात्र मुलांचं लक्ष वेगळीकडेच, अजितदादांचं मिश्कील वक्तव्य - Ajit Pawar Speech - AJIT PAWAR SPEECH

Ajit Pawar Speech :अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मिश्कील वक्तव्य करत मुली राज्यात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलांचं लक्ष मात्र वेगळीकडेच असते. मुलांचं इकडे बघ..तिकडे बघ.. ही बी चांगली ती बी चांगली असं सुरू असतं, जरा मुलींकडून शिका, असा सल्ला अजितदादांनी मुलांना दिला आहे.

ajit pawar
अजित पवार (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 7:22 PM IST

कोल्हापूर Ajit Pawar Speech : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार हे कोल्हापुरातील चंदगडच्या दौऱ्यावरून आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील यांना पुन्हा निवडून द्या, असं आवाहन त्यांनी चंदगडच्या जनतेला केलं आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाला 1600 कोटी रुपये मी दिले. राजेश पाटलांना निवडून दिल्यानंतर पुढच्या पाच वर्षांत दुप्पट निधी नाही दिला तर नाव बदलतो, असंही अजित पवारांनी अधोरेखित केले आहे. लाडकी बहीण योजनेसह सर्वच योजनांच्या बाबतीत महायुतीने आपला शब्द पाळलेला आहे. यामुळे मी महिला भगिनींना विनंती करीत आहे, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. एक माजी मंत्री ही योजना बंद करणार, असं म्हणाला होता. विरोधकांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले आहे. मात्र आपल्याला आता ही योजना आता बंद करायची नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोल्हापुरातील नेसरी येथील कार्यक्रम अजित पवार बोलत होते.

केंद्रात आमच्या विचाराचे सरकार: तसेच 15 ऑक्टोबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रात आमच्या विचाराचे सरकार असून, राज्याच्या विकासाबाबत आम्ही तिथे भांडू शकतो. विरोधकांचं सरकार आल्यानंतर ते म्हणतील केंद्र सरकार आमचं ऐकत नाही, आम्ही काय करू. आम्ही आंदोलनं करतो, उपोषण करतो, सत्याग्रह करतो, असं विरोधक म्हणतील पण त्याने काहीही साध्य होणार नाही. त्याने आपले पोट भरणार का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी निवडणूक होणार असून, महाविकास आघाडीसह महायुती कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून विभक्त होत सरकारमध्ये सामील झाले खरे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीला बसलेला फटका पाहता विधानसभा निवडणुकीत अजित पवार जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आहेत. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात येऊन पोहोचली आहे. दरम्यान, अजित पवार यांच नेसरी येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जनतेशी संवाद साधताना अजित पवार यांनी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इचलकरंजीमध्ये मेळावा असल्याने ते इथे आले नाहीत. कारण नसताना तुमचा गैरसमज नको म्हणून हे पहिल्यांदाच सांगतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वधर्म समभावाची भूमिका घेतली आहे. जातीभेद करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही. गेल्या पाच वर्षांत आम्ही चार वर्ष सत्तेत राहिलो. कोरोना काळात सर्वतोपरी मदत करण्याचं काम आम्ही केलं. आम्ही पाठवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचा मोठा आधार सामान्य महिलांना झाला आहे. शिवाय हे करत असताना राज्यातील आर्थिक शिस्त कुठेही बिघडू दिलेली नाही, विकास थांबलेला नाही. आम्ही पण अनेक वर्ष सत्तेत आहोत. इतकी वर्ष आम्ही काय गोट्या खेळत होतो का? आम्ही येणाऱ्या निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आणत आहोत. आम्ही आलो तरच या योजना पुढे सुरू राहणार आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.

मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर, मुलांचं लक्ष वेगळीकडे: दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मिश्कील वक्तव्य करत मुली राज्यात सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलाचं मात्र लक्ष वेगळीकडेच असते. मुलाचं इकडे बघ..तिकडे बघ.. ही बी चांगली ती बी चांगली असं सुरू असतं, मुलींकडून जरा शिका, असं म्हणत अजितदादांनी मुलांना सल्ला दिला. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार, असा प्रचार विरोधकांनी केला. पण जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही. आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू शकते, याआधी शेतकऱ्यांना शून्य वीज बिल देण्याचं नियोजन सुरू आहे. पुढच्या सहा महिन्यांत शेतीला दिवसा वीज आम्ही देणार आहोत. तसेच चंदगड भागातील शेतकऱ्यांनी हत्ती, गवे, रानडुक्कर शेतामध्ये येत असल्याची तक्रार केली आहे. शेतकऱ्यांचा दुःख कमी करणे सरकार म्हणून आमचं काम आहे. मी इथल्या वन विभागाशी बोलून मार्ग काढणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचाः

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.