ETV Bharat / state

झारखंडमधील वातावरणाचा रायगड, सातारा जिल्ह्याला फटका; हवामान विभागानं जारी केला रेड अलर्ट - IMD Issues Red Alert

IMD Issues Red Alert : झारखंडमधील हवामानाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागानं सातारा आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

IMD Issues Red Alert
लोकल स्थानकावर झालेला परिणाम (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 7:30 AM IST

Updated : Jul 24, 2024, 7:37 AM IST

मुंबई IMD Issues Red Alert : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. अशातच आता हवामान विभागानं पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान झारखंडमधील वातावरणाचा रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

झारखंडच्या वातावरणाचा रायगड, सातारा जिल्ह्याला फटका : मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाची संततधार सुरू राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र, विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मध्यप्रदेश आणि झारखंड इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातील मध्यप्रदेश राज्यात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता बऱ्यापैकी निवळला असून, झारखंड आणि परिसरात सात किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारं वाहण्याची शक्यता आहे. या दोन राज्यातील हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं रायगड आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडं, नंदुरबार, मुंबई, धुळे, जळगाव या जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं, या भागाला मध्यम स्वरूपाचा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात मात्र नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, विदर्भातील उर्वरित भागात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हेही वाचा :

  1. साताऱ्यासह रत्नागिरीला रेड अलर्ट; कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Heavy Rain In Mumbai And Satara
  2. आधी पावसाची प्रतीक्षा, आता धो-धो; शेतात तळं तयार झाल्यानं बळीराजा संकटात - Heavy Rain in Amravati
  3. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा 'धुमधडाका'; चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद - Heavy Rain In Satara

Last Updated : Jul 24, 2024, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.