कोटा IIT JEE Advanced 2024 Exam : भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि कठीण परीक्षेपैकी एक परीक्षा म्हणजे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीची परीक्षा आहे. ही परीक्षा आज (२६ मे) होणार आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते १२ आणि दुसऱ्या सत्र दुपारी २.३० ते ५.३० या कालावधीत असेल. परीक्षेला १.९१ लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असून त्यातील ९५ टक्के विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. परीक्षेचा निकाल ९ जून रोजी जाहीर करण्यात येईल. तुम्हीदेखील जेईई ॲडव्हान्स परीक्षा देत असाल तर परीक्षेदरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळं अनावश्यक ताण टाळता येवू शकतो.
कोटा येथील दोन सेंटरमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देशातील २२२ शहरांमध्ये जवळपास १०००० सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर विदेशातील अबूधाबी, काठमांडी आणि दुबई या तीन शहरात देखील परीक्षा केंद्र आहेत. शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संबंधित काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळं विविद्यार्थी एकाग्रतेने परीक्षा देवू शकतील व त्यांचं मनोबल देखील वाढेल.
- ज्या प्रश्नाची उत्तर मला येत नाही, त्याचं उत्तर इतरांनाही येत नसल्याचं गृहीत धरून परीक्षा द्यावी. कारण यामुळं तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार नाही.
- परीक्षेपूर्वी होणाऱ्या चेंकिंगला कंटाळू नये. परीक्षा केंद्रावर दोन वेळा चेकिंग घेण्यात येणार आहे.
- परीक्षे दरम्यान संगणक बिघाडल्यास घाबरू नये. संगणक बिघडला असल्याची माहिती परीक्षकांनी द्यावी.
- तुमच्या आजूबाजूला बसलेल्या विद्यार्थींना पाहून विचलित होऊ नका. तुमच्या प्रश्नपत्रिकेवर लक्ष केंद्रित करा.
- परीक्षेचा कालावधी 3 असेल, अशा परिस्थितीत मनाची तयारी करून पूर्ण ऊर्जेने उत्तर पत्रिका लिहा.
- पेपर १ आणि पेपर २ च्या मधील फावल्या वेळात एकमेकांशी पेपर १ संबंधीत चर्चा करु नये. कारण पेपर १ बद्दल चर्चा केल्यास तुमच मनोबल कमी होवून त्याचा परिणाम पेपर २ वर होवू शकतो. त्यामुळे पेपर १ ज्या उत्सहात तुम्ही दिलं त्याच उत्साहात २ देखील द्या.
- पहिल्या पेपर मधील सोपं आणि अवघडपणा पाहून दुसऱ्या पेपरबद्दल चिंता करू नये.
- पहिला पेपर अपेक्षेप्रमाणं गेला नसल्यास हताश होवू नका. दुसरा पेपर उत्साहानं द्यावा.
- पेपर सोडवण्याआधी पेपेरवरील सूचना वाचा. पेपर १ आणि पेपर २ मधील सूचना वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळं काळजीपूर्वक सूचना वाचा.
- कोणत्याही एका प्रश्नावर जास्त वेळ घालवणे टाळा.
हेही वाचा