ETV Bharat / state

पूजा खेडकर यांच्याविरोधात सर्वप्रथम माहिती देणारे अधिकारी अडचणीत? वाशिम पोलिसात मानसिक छळाची तक्रार - IAS Pooja Khedkar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 7:54 AM IST

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे तशी तक्रार करत कारवाईची मागणी केलीय.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar (Source - ETV Bharat)

वाशिम IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात सर्वप्रथम कारवाईचा अहवाल देणारे अधिकारी अडचणीत आले आहेत. आयएएस पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे तशी तक्रार दाखल केली आहे.

पूजा खेडकर यांचा नेमका आरोप काय? : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप पूजा खेडकर यांनी केलाय. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे. त्यांनी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पूजा खेडकर यांनी मागणी केलीय.

प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. त्यांना मसुरीतील अकॅडमीत परत बोलावण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनं दिलेल्या निर्देशानुसार सरकारकडून ही कारवाई करण्यात आली. पूजा यांना 23 जुलै 2024 पूर्वी लवकरात लवकर मसूरी येथील ॲकॅडमीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर यांच्यावर काय आहेत आरोप : शिक्षणार्थी असतानाही स्वतःला स्वतंत्र केबिन आणि सरकारी गाडीची मागणी पूजा खेडकरांनी केली होती. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर ठेवले. तसेच स्वतःच्या ऑडी कारवर अंबर दिवा लावला. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर पूजा खेडकरांबद्दल रोज नवनवीन खुलासे समोर आले. यावर आयएएस खेडकर यांनी संपूर्ण चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा दावा केला. दुसरीकडं शेतकऱ्यांना धमकाविल्याबद्दल त्यांची आई मनोरमा आणि वडील दिलीप खेडकर हे बेपत्ता आहेत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा

  1. IAS पूजा खेडकर यांना दणका; प्रशिक्षण स्थगित करत मसुरीला बोलावलं - IAS Pooja Khedkar Called Mussoorie
  2. पूजा खेडकरांमागे 'दिवे' लावल्यानं शुक्लकाष्ठ; आरटीओ, पोलिसांसह पुणे महानगरपालिकेनं 'या' कारणांनी बजाविली नोटीस - IAS Pooja Khedkar
  3. वाशिम पोलिसांकडून चौकशी नाही, मीच त्यांना बोलावलं होतं-पूजा खेडकर - IAS Pooja Khedkar
  4. पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 'YCM' रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र - IAS Pooja Khedkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.