पुणे/वाशिम- IAS Pooja Khedkar ''गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निर्दोष आहे. हे आपलं संविधान सांगतं.'' असं वक्तव्य परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केले. त्यांनी हे वक्तव्य वाशिमध्ये माध्यमांशी बोलताना केलयं. वादांच्या मालिकांनंतर पूजा यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, "माध्यमांवर माझा विश्वास आहे. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जे सत्य आहे, ते सर्वांसमोर येईल. समिती तिचं काम करेल. समितीचा अहवाल आल्यानंतर मी स्वत: माध्यमांना अहवाल देईन. पोलीस चौकशीसाठी आले नव्हते. त्यांना मी काही कामासाठी बोलावले होतं."
वाशिम पोलिसांची पूजा खेडकर यांच्याशी चर्चा: नियमबाह्य पद्धतीनं वागल्याचा आरोप झाल्यानंतर प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांची पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांच्याबरोबर चर्चा केली. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यासह इतर दोघींचा समावेश होता. चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याकडून पूजा खेडकर यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली? हे मात्र कळू शकलेलं नाही.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी: सोमवारी रात्री वाशिम इथल्या विश्रामगृहातील निवासस्थानी पोलिसांची टीम दाखल झाली आहे. या टीममध्ये तीन महिला पोलीस आणि इतर ६ पोलीस होते. रात्री इतक्या उशिरा तीन महिला पोलीस अधिकारी पूजा खेडकर यांच्या रूममध्ये कोणत्या चर्चेसाठी आले होते? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
दिव्यांग संघटनांनी केली मागणी: पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी दिव्यांग संघटनांनी केली आहे. याबाबत दिव्यांग संघटनेकडून अपंग कल्याण आयुक्तांना तक्रार अर्जही देण्यात आला होता.
हेही वाचा
- पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 'YCM' रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र - IAS Pooja Khedkar
- आद्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी केली विधीवत पूजा - Avimukteshwaranand at Matoshree
- पूजा खेडकर यांना विचारले अनेक प्रश्न पण उत्तर मा्त्र एकच "माझं जे काही असेल..." - IAS Pooja Khedkar