पुणे Pooja Khedkar : वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन तसंच मानसिक आजारी असल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप होत आहे. विविध आरोपानंतर त्यांची पुण्यातून वाशीमला उचलबांगडी करण्यात आली. आता या प्रकरणात पूजा खेडकर यांनी वापरलेली 'लाल दिव्याची' ऑडी कार वाहतूक विभागानं चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात आणली आहे. पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ऑडी कारवर 21 चलन प्रलंबित : पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर 'महाराष्ट्र शासन' तसेच लाल दिवा लावला होता. ती कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्यानं या कार मालकावर 21 चलनातून दंड ठोठावण्यात आली आहेत. पूजा खेडकर यांनी कारवर लाल दिवा लावला होता. तसंच कारवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. 2022 पासून आतापर्यंत त्यांच्या कारवर वाहतुकीचे नियम मोडणे, वाहन अतिवेगानं चालवणं, सिग्नल तोडणे असे 21 चलन प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलिसांकडूंन देण्यात आली होती.
#WATCH | Pune, Maharashtra: The Audi car used by trainee IAS officer Pooja Khedkar has been brought to the Chaturshringi police station of the traffic division. It has been brought here for further investigation and document verification. pic.twitter.com/2IXbCBRmTi
— ANI (@ANI) July 14, 2024
मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना नोटीस बजाविली आहे. नोटीसमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे की, "तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये? याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. येत्या 10 दिवसात तुमचे उत्तर कार्यालयास लेखी स्वरुपात सादर करावं. तसेच मुदतीत तुमचे उत्तर प्राप्त न झाल्यास या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल." ही नोटीस पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घराबाहेर लावली आहे."
पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर आणि इतर पाच जणांवर भारतीय न्याय पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मागील वर्षी 5 जून 2023 रोजी मुळशी तालुक्यातील धडवली येथील सर्व्हे नं.12/1 मध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न खेडकर कुटुंबियांकडून करण्यात आला. याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती खेडकर यांच्या वकिलानं दिली होती.
पुणे महापालिकेनं बजावली नोटीस : शनिवारी संध्याकाळी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील बाणेर रोडवरील 'ओम दीप' बंगल्यात मनोरमा खेडकर यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला. दारावरची बेल वाजल्यानंतरही अधिकाऱ्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजावर नोटीस चिकटवली. "तुमच्या बंगल्याबाहेर उभारण्यात आलेल्या बांधकामांमुळे लोकांना अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. येत्या सात दिवसांत बंगल्याच्या सीमावर्ती भिंतीनजीक लागून असलेली अनधिकृत बांधकामे हटवा," असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनोरमा खेडकर यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा
- बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-दिव्यांग नागरिकांची मागणी - Pooja Khedkar controversy
- पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन; जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला मोठा खुलासा - IAS Pooja Khedkar
- शेतकऱ्याला धमकी देणं भोवलं; आयएएस पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल - IAS Pooja Khedkar