ETV Bharat / state

पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; दिव्यांगत्वाची दोन प्रमाणपत्र असताना तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज - IAS Pooja Khedkar - IAS POOJA KHEDKAR

IAS Pooja Khedkar : परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीतील वाढ काही कमी होताना दिसत नाही. आधीच दोन दिव्यांग प्रमाणपत्र असताना त्यांनी तिसऱ्यांदाही दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं उघड झालं आहे.

IAS Pooja Khedkar
आयएएस अधिकारी पूजा खेडकर (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 3:47 PM IST

पुणे IAS Pooja Khedkar : ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला. आधीच दोन दिव्यांग प्रमाणपत्र असताना त्यांनी तिसऱ्यांदाही दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं उघड झालं. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात 22 ऑगस्ट 2022 ला त्यांनी अर्ज केला होता. मात्र, रुग्णालय प्रशासनानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, दोन प्रमाणपत्र असताना पूजा खेडकर यांनी तिसऱ्यांदा अर्ज का केला? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय.

तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी केला अर्ज : पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आणखी खोल वादाच्या भोवऱ्यात खेडकर कुटुंब सापडत आहे. दोन प्रमाणपत्र असताना खेडकर यांनी तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज का केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूजा खेडकर यांची आधीची दोन प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रमाणपत्राची केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीकडूनही चौकशी केली जाणार आहे. परंतु, त्यांनी तिसऱ्या पत्रासाठी देखील अर्ज केलेला होता. खेडकर यांनी नाव बदलून परिक्षा दिल्याचीही माहिती समोर येत आहे. पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचं एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती आहे. तसंच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे यांनी सांगितलं.

दिव्यांग प्रमाणपत्रासह नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा वाद : पूजा खेडकरनं UPSC नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र देखील जोडलं होतं. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्यांना ओबीसी नॉन क्रीमीलेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे तिने हे पद मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता

दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय एमबीबीएसला घेतला होता प्रवेश : पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये 2007 मध्ये MBBS डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन घेतलं. यावेळी पूजा खेडकर यांनी ओबीसी-भटक्या जमाती-3 कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळवलं. पण यावेळी अ‍ॅडमिशन घेत असताना त्यांनी कोणतंही अपंगत्व प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा केलं नव्हतं. पूजा खेडकर यांना 200 पैकी 146 गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी विनाअनुदानित खासगी कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतलं. पूजा यांना दहावीला 83 टक्के मार्क मिळाले होते. तर बारावीला 74 टक्के गुण पूजा यांनी मिळवले होते. तर पूजा खेडकर यांनी नावामध्ये बदल करुन यूपीएससीला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला. पूजा खेडकर यांचं यूपीएससीचं अटेम्प्ट संपलं असतानाही त्यांनी नावात बदल करुन पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरनं 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी 2019-20 पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावानं यूपीएससीची परीक्षा दिली. तर 2021 आणि 2022 ला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावानं यूपीएससीची परीक्षा दिली. युपीएससीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत.

9 वेळा दिली युपीएससीची परीक्षा : सरकारनं नावात आईचं नाव लावण्याचा निर्णय 2024 मध्ये घेतला आहे. मात्र पूजा खेडकर यांनी 2021 पासूनच आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश केला होता. त्याआधी त्या आईचे नाव का वापरत नव्हत्या हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांनी 9 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांचं हे अटेम्प्ट 2019-20 मध्येच संपल्याची बातमी आहे. त्यामुळंच 2020 मध्ये आधी कॅटकडे म्हणजेच केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे याचिका केली. या याचिकेमधून त्यांनी बहुविकलांगत्वासाठी त्यांना यूपीएससीचं अटेम्प्ट वाढवून मिळावं. तसंच, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणं अमर्यादित संधी देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. पण कॅटनं पूजा खेडकर यांची ही मागणी फेटाळली.

हेही वाचा :

  1. "...तर मुलीला मी राजीनामा द्यायला सांगेन", आयएएस पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचं मोठं वक्तव्य - IAS Pooja Khedkar controversy
  2. पूजा खेडकरच्या फरार कुटुंबाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू, पंतप्रधान कार्यालयानं सविस्तर मागिवला अहवाल - IAS Pooja Khedkar Family Absconded

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.