सोलापूर Sushilkumar Shinde On Kashmir Visit : केंद्रीय गृहमंत्री असताना जम्मू काश्मीरला भेट देताना मी घाबरत होतो, असं खळबळजनक वक्तव्य तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या 'फाईव्ह डिकेडस इन पॉलिटिक्स' या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असतानाही काश्मीरमध्ये जायला घाबरत होतो, असं वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यावरुन आता चांगलंच राजकारण तापलं आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सुशिलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यानं मात्र राजकारण तापलं आहे.
लाल चौकात जाण्यासाठी घाबरलो होतो : "मी गृहमंत्री होण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञ विजय घर यांना भेटत असे. त्यांच्याकडून मी सल्ला घ्यायचो. त्यांनी त्यावेळी मला इकडं तिकडं न फिरता श्रीनगरच्या लाल चौकात भेट द्यायला सांगितलं. तिथल्या लोकांना भेटून दल सरोवराभोवती फिरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझी चांगली प्रसिद्धी झाली. लोकांना वाटलं की एक गृहमंत्री इथं बिनधास्त जातो. पण लोकांना काय माहीत की मी किती घाबरलो होतो. मी तुम्हाला हसवण्यासाठी हे सांगितलं, पण एक माजी पोलीस असं बोलू शकत नाही," असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.
पी चिदंबरम यांच्यानंतर गृहमंत्री झाले सुशिलकुमार शिंदे : तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2012 मध्ये गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती केली होती. पी. चिदंबरम यांच्यानंतर गृहमंत्रीपदाचा कार्यभार सुशीलकुमार शिंदे यांनी सांभाळला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीनगरच्या लाल चौकात खरेदी केली. आपल्या कुटुंबासाठी खरेदी करण्यासाठी ते जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील काश्मीर आर्टस शोरुममध्ये गेले होते.
हेही वाचा :