पुणे helicopter crashes in Pune - मुंबईहून हैदराबादकडे उड्डाण करणारे हेलिकॉप्टर शनिवारी दुपारी पुण्याच्या मुळशी तहसीलमध्ये कोसळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पौडजवळ झालेल्या अपघातात चारही प्रवासी बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली असावी, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. हेलिकॉप्टरचा कॅप्टन हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे, तर इतर तीन हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचे आहे, असे त्यांनी सांगितलं.
पुण्यातील पौड या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं आहे. यातील पायलट गंभीर जखमी तर तीन सहकारी सुखरूप बचावले आहेत. पुणे जिल्ह्यातील पौडजवळ AW139 नावाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या घटनेत हेलिकॉप्टरचा पायलट जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबईवरून हैदराबादला जात असल्याची माहिती मिळाली आहे. पौडजवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे.
खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हेलिकॉप्टर ग्लोबल हेक्ट्रा या नावे असून, या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच तीन सहकारी असल्याची माहिती आहे, तेही यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं आहे. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या अपघातात हेलिकॉप्टर मधील प्रवाशी पायलट आनंद कॅप्टन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर सोबत सहकारी दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितलंय. हा अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. अचानक कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ जवळच्या शेतातील कामगारांनी टिपला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.