ETV Bharat / state

वर्धेत नरबळीचा प्रयत्न, बालकाला पूजा करण्याच्या बहाण्यानं बोलवून विहिरीत ढकललं - वर्धेत नरबळीचा प्रयत्न

Human Sacrifice attempt In Wardha : वर्धेत बारा वर्षीय बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Child pushed into well) यामध्ये एका महिलेनं एका 12 वर्षीय बालकाला विहिरीजवळ पूजा करायला बोलावलं आणि त्यानंतर त्याला विहिरीत ढकलून दिलं. बालक विहिरीतील दोरीच्या साहाय्याने बाहेर आल्यानं घटनेचं बिंग फुटलं.

Human Sacrifice In Wardha
वर्धेत नरबळीचा प्रयत्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 9:35 PM IST

नरबळीच्या प्रयत्नाच्या घटनेवर माहिती देताना पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते

वर्धा Human Sacrifice attempt In Wardha : बारा वर्षीय बालकाला नरबळी देण्याच्या उद्देशानं पूजा करायला लावून विहिरीत ढकलण्याची खळबळ जनक घटना वर्धेच्या नालवाडी येथील नागसेननगर परिसरात घडली आहे. (Attempted murder of child) दैव बलवत्तर म्हणून बालक विहिरीतून दोरीच्या साहाय्याने बाहेर आलाय. बालकानं ही बाब घरच्यांना सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि शहर पोलिसात नरबळी व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय.

त्या दोरामुळे वाचला बालकाचा जीव : आजच्या विज्ञान युगामध्येसुद्धा अंधश्रद्धेच्या घटना घडत आहेत. वर्धेच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात एक बारा वर्षांचा बालक त्याच्या आजीकडे राहतो. 21 जानेवारी रोजी तो भिजलेल्या कपड्यानं घाबरलेला घरी परतला. घरच्यांनी विचारलं असता त्यानं हकिकत कथन केली. घरासमोरील मैदानावर पतंग उडवत असताना जवळच राहणाऱ्या आरोपी शारदा राजू वरके काम पाहण्याच्या बहाण्यानं बालकाला सोबत घेऊन गेली. तिनं त्याला नागसेन नगर मधील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ नेलं आणि विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं. फुलं टाकायला सांगून प्रथम छोटा आणि नंतर मोठा दगड विहिरीत टाकायला सांगितलं. बालक हा शेंदूर लावत असताना आरोपी महिलेनं त्याला विहीर ढकललं. यानंतर महिला तेथून पसार झाली. विहिरीत पाईपला बांधून असलेल्या दोरीच्या साह्याने बालक बाहेर आला आणि घटनेचं बिंग फुटलं.

आरोपी महिला मनोरुग्ण? घटनेनंतर बालकाची आजी निर्मला हिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा आणि सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी व इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून शहर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेनंतर आरोपी असलेली महिला मनोरुग्ण आहे. ती पतीला बेवारस सोडून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. शहर पोलिसांनी त्या महिलेच्या शोधार्थ चमू नियुक्त केल्या आहेत.

हा तर नरबळीचा नवीनच प्रकार : काहीतरी प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं किंवा गुप्तधन अथवा काही मिळवण्याच्या प्रकारातून नरबळी दिला जातो. ही अंधश्रद्धा आहे. बालकाला पूजा करायला लावून विहिरीत ढकलणं हा नवीन प्रकारचा नरबळी आहे. सुदैवानं घटनेत मुलगा वाचला आहे. 2013 साली बनलेला जादूटोणा विरोधी कायदा हा नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला; परंतु त्याबाबत काही नियम बनवलेले नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृती करते; परंतु सरकारचं पाठबळ मिळत नाही. छोट्या बालकांना, मुलांना एकटं सोडू नये. असा प्रकार आढळल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीला किंवा पोलीस ठाण्यात कळवावं, असं आवाहन गजेंद्र सुरकार यांनी केलय.

हेही वाचा:

  1. मराठा आंदोलकांसाठी नाशिकहून मुंबईला रसद पुरवठा, हजारो मराठा बांधव पुण्याच्या दिशेने रवाना
  2. जरांगेंचं आंदोलन परवानगी घेऊन शांततेत होईल याची जबाबदारी शासनाची - मुंबई उच्च न्यायालय
  3. टाइम्स स्क्वेअरवर झळकावलं मराठा आंदोलनाचं बॅनर, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.