ETV Bharat / state

दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; वाचा, परीक्षेचे वेळापत्रक - SSC HSC Exam Time Table 2025

Maharashtra Board Exam : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस लवकरच घेतल्या जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक आणि यश मिळविण्याकरिता टिप्स वाचा.

10th and 12th exam dates announced by the maharashtra state board
दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; राज्य मंडळाकडून तारखा जाहीर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 8:57 PM IST

मुंबई Maharashtra Board Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दिसऱ्या आठवड्यात घेतली जाते. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. तर परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. तर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधारण्याकरिता परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

या कारणानं यंदा लवकर परीक्षा- विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्यानं अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्याकरिता मंडळानं परीक्षेच्या तारखा यंदा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता २०२५ ची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा ८ ते १० दिवस आधी घेण्यात येणार आहे.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक :

१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५

२) बारावीचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन

शुक्रवार २४ जानेवारी २०२५ ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५

३) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा

शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार १७ मार्च २०२५

४) दहावीचे प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन

सोमवार ३ फेब्रुवारी २०-२५ ते गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५

शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूनं तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं फेब्रुवारी मार्च २०२५ च्या प्रात्याक्षिक आणि लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहेत. वेळापत्रकाबाबत २३ ऑगस्टपर्यंत ई-मेलवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे राज्यमंडळाच्या सचिव अनुराध ओक यांनी म्हटलं आहे.

परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हे लक्षात ठेवा.

  • आत्मविश्वास सोडून नका: जीवनात करिअरला सर्वाधिक प्राधान्य द्या. तरच तुम्ही आपल्या यश मिळवू शकाल. संकटाच्या काळात तुमचे मनोबल नेहमी उंच ठेवा. इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखू नका.
  • परीक्षेचे चांगले वेळापत्रक करा: कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी नियमितता आणि वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचं असते. दररोज वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी योग्य वेळापत्रक तयार करा. त्या वेळापत्रकाचं पालन करा. अवघड विषयांना सर्वाधिक वेळ द्या.
  • निराश होऊ नका: अनेक मुले अनुत्तीर्ण होतात. तर काही चांगले यश मिळवितात. पण, निराश न होता परीक्षेची चांगली तयारी करा. कारण, निराश असल्यानंतर तुमची क्षमता पूर्ण वापरली जाऊ शकत नाहीत. स्वतःची मानसिकता सुदृढ आणि आरोग्य चांगले ठेवणं आवश्यक आहे.

हेही वाचा -

  1. पेपर फुटला तर आता खैर नाही, होऊ शकतो १ कोटी रुपयांचा दंड, १० वर्षे तुरुंगवास; पेपर लीक विरोधी कायदा लागू - Anti Paper Leak Act
  2. दहावेळा दहावी नापास झालेला मुलगा बापाच्या जिद्दीनं झाला अकराव्यावेळी पास; गावकऱ्यांनी काढली मिरवणूक - Ten Times SSC Exam Failed
  3. 35 टक्के काठावर पास! विद्यार्थ्यांनं सर्व विषयांमध्ये मिळवले परफेक्ट 35 गुण, केक कापून आनंद साजरा - Maharashtra SSC Result

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.