ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana - LADKI BAHIN YOJANA

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारनं पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली. मात्र, मोबाईलवर ॲप डाऊनलोड करुन ऑनलाइन पद्धतीनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा? प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा फक्त 'ईटीव्ही भारत'वर...

Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Source : ETV Bharat GFX Team)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 9:38 PM IST

Updated : Jul 22, 2024, 10:16 PM IST

मुंबई Ladki Bahin Yojana : पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली. या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये सरकारकडून मिळणार आहेत. यामुळं याची चर्चा सर्वत्र असून, या योजनेला उस्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं याचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रोसेस (Source : ETV Bharat Reporter)

ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? : ग्रामीण भागात ऑफलाईन पद्धतीनं अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शासकीय सेवा केंद्रावर अर्ज दाखल केला जात आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नेमका कसा भरायचा? कोणतं ॲप डाऊनलोड करायचं? हा अर्ज नेमका कसा दाखल करायचा? आणि अर्ज भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? याबाबत अजूनही गाव-खेड्यातील लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. मोबाईलवर ॲप डाऊनलोड करुन ऑनलाइन पद्धतीनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा याचा प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा.

काय आहेत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या नियम आणि अटी :

  • कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं.
  • जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड चालू शकतं. यो दोन्हीमुळे
  • उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता (इनक्म टॅक्स) म्हणजे वार्षिक उत्पन्न कर भरणारा नसावा.
  • अर्जदार स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा.
  • अर्जदार शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रु 1,500/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.
  • कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/सदस्य नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नसावं.
  • एका कुटुंबात जास्तीत जास्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार नाही.

कसा दाखल करणार अर्ज? : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरु शकता. अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिथं शासनाचं सेवा केंद्र आहे, या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज दाखल करायचा असल्यास गुगल किंवा प्ले स्टोअरमधून 'नारी शक्ती दूत' हे Application डाऊनलोड करुन या Application च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज दाखल करता येऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रं कोणती?

  1. आधार कार्ड (जे बँकेशी संलग्न असावं)
  2. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा उत्पनाचा दाखला
  3. जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
  4. बँक पासबुक
  5. हमीपत्र
  6. पासपोर्ट साईज फोटो

हेही वाचा :

  1. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी खास मदत कक्ष; अडचणी असल्यास बिनधास्त करा 'या' नंबरवर कॉल - Majhi ladki Bahin Yojana
  2. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार 'गिफ्ट'; अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यात उपक्रम - Uddhav Thackeray Birthday

Last Updated : Jul 22, 2024, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.