नंदुरबार Holi 2024 : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या राजवाडी होळी ही सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आदिवासी बांधव साजरा करत असतात. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही रविवारी मोठ्या थाटात झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या होळी उत्सवात लोकसभा उमेदवारांनीदेखील हजेरी लावली.
पारंपरिक ऐतिहासिक काठी संस्थांची राजवाडी होळी : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक काठी संस्थांच्या राजवाडी होळीचा इतिहास आहे. आदिवासी समाजात या होळी उत्सवाला मोठं महत्त्व दिलं जात असतं. आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्त्वाचं स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा 'होलिकोत्सव' सुरू केल्याचं म्हटलं जातं. 1246 पासून सुरू झालेला हा 'होलिकोत्सव'आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरुप कायम ठेऊन आहे. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीच्या राजवाडी होळी सणाचा मोठा उत्साह असतो. आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक रुपात साजरी केली. ढोल, बासरी, शिट्ट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली.
आदिवासी समाज होळी उत्सवात एकवटला : होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण मानला जातो. होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब - श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या “काठी” संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते. याचं कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही. तसंच कुणाला मानसन्मानही दिला जात नाही. तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव-भगिनी घरचं कार्य असल्याप्रमाणे हक्कानं सामील होतात. होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद राहत नाही. गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातील ऊर्जा पाहिल्यावर इथं येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे. त्याचं प्रमुख कारण ठरलंय ते म्हणजे काठीची ही राजवाडी होळी आहे.
राजकीय नेत्यांची राजवाडी होळीला हजेरी : राजवाडी होळीत आदिवासी समाज मोठ्या उत्साहानं सामील होत असतो. यात राजकीय व सामाजिक नेते मंडळी सहभागी होत असतात. माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार ॲड. के. सी. पाडवी, काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी, भाजपाच्या लोकसभा उमेदवार खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळींनी होळी उत्सवात सहभाग नोंदवला.
हेही वाचा :