पुणे Hement Patil Demand : महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी काल (19 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. या सर्व लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी दिलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च सर्वच राजकीय पक्ष करत आहे. आयोगाने याची दखल घेत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रवींद्र धंगेकर यांच्यावर खर्चाबाबत योग्य ती कारवाई करण्याची यावी, अशी मागणी अपनी प्रजाहित पार्टीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी केली आहे.
'या' खर्चांचा मांडला हिशेब : प्रजाहित पाटील म्हणाले की, काल महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच महायुतीचे उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार त्यांनी अफाट खर्च केलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी 1 कोटी 2 लाख, सुनेत्रा पवार यांनी 1 कोटी 5 लाख, रवींद्र धंगेकर यांनी 99 लाख असा खर्च अर्ज भरतेवेळी केला आहे. यामध्ये पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला अर्ज भरतेवेळी प्रत्येक व्यक्ती 500 ते 800 रुपये देऊन हजारो लोक आणण्यात आली. त्यांच्या गाड्यांच्या डिझेलचा खर्च, स्पीकर खर्च, झेंडे, उपरणे, पाणी बॉटल, जेवण खर्च, व्यासपीठांचा खर्च, मंडप खर्च आदी खर्च करून या तिन्ही उमेदवारांच्या अर्ज भरतेवेळी झालेल्या जाहीर सभेचा खर्च आपल्या लोकसभेच्या खर्चात दाखवणे बंधनकारक आहे; परंतु हे हा खर्च दाखवू शकणार शकले नाहीये. याबाबत प्रशासनाने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
कोटींचा खर्च, निवडणूक नियमांचा भंग : काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे सर्व पक्ष आपल्या जाहीर सभेवरती कोटींचा खर्च करून निवडणूक आयोगाच्या नियमाचा भंग करीत आहेत. याबाबत कोणीच दखल घेऊन कारवाई करण्याबाबत प्रयत्न करीत नाही. पुण्यातील कालच्या सभेच्या बाबत मी स्वतः पुढे येऊन ही तक्रार करीत आहे. जर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी लाखो करोडोंचा खर्च होत असेल तर मतदान होईपर्यंत हे तिन्हीही उमेदवार मोठ्या प्रमाणावर खर्च करून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग करतील. याची प्रशासनाने चौकशी करून या तिन्ही उमेदवारांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, असं यावेळी प्रजाहित पाटील म्हणाले.
हेही वाचा :