ETV Bharat / state

विक्रोळीत मुसळधार पावसामुळं इमारतीचा स्लॅब कोसळला; बाप-लेकाचा मृत्यू - Mumbai Vikhroli News - MUMBAI VIKHROLI NEWS

Mumbai Vikhroli Slab Collapse Accident : मुंबईत रविवारी (9 जून) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं विक्रोळी येथे इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Mumbai Vikhroli Slab Collapse Accident
विक्रोळीत मुसळधार पावसामुळं घराचा स्लॅब कोसळला; बाप-लेकाचा मृत्यू (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 9:22 AM IST

Updated : Jun 10, 2024, 10:46 AM IST

मुंबई Mumbai Vikhroli Slab Collapse Accident : मुंबईत रविवारी (9 जून) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं विक्रोळी येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत एका अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (10 जून) सदरील घटनेची माहिती दिली आहे.

बीएमसी आपत्ती विभाग नियंत्रणाच्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.15 च्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या पाच मजली इमारतीत हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी मुंबई अग्निशमन विभागाला सांगितलं की, पॅरापेटचा काही भाग (लोखंडी बीम) आणि मजल्याचा स्लॅब कोसळलाय. तुटलेल्या स्लॅबचा काही भाग लटकला होता. हा भाग अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपकरणाच्या मदतीनं काढला. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाप-लेकाला बाहेर काढलं. त्यानंतर तात्काळ त्यांना बीएमसीच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांचा शोध सुरू असल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

डब्बा देण्यासाठी आला अन्... : नागेश आर रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी (10) असं मृत बाप-लेकाचं नाव असून नागेश हे विक्रोळीतील एका इमारतीत सुरक्षारक्षकाचं काम करत होते. रविवारी रात्री त्यांचा मुलगा रोहित त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता. डब्बा दिल्यावर तो आपल्या वडिलांशी बोलत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला आणि या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

दुर्घटनेला जबाबदार कोण? : कैलास बिझनेस पार्क, टाटा पॉवर हाऊसजवळ, पार्क साइट, विक्रोळी पश्चिम येथे ही घटना घडली. नवीन इमारतीचा स्लॅब कोसळलाच कसा? इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलं होतं का? तसंच या प्रकरणी बिल्डरवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जाताय.

मागील महिन्यात स्लॅब कोसळून दोन वृद्धांचा मृत्यू : 30 मे रोजी विक्रोळीतील एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दोन वृद्धांचा मृत्यू झाला होता. विक्रोळी, कन्नमवारनगर येथील गुरुकृपा सीएचएस इमारतीत सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.

मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं : भारतीय हवामान विभागानं मान्सून 10 जूनला राज्यात येण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच मान्सूनचं राज्यात आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय. रविवारी रात्री 11.55 वाजता लोअर परळ, प्रभादेवी भागात आणि आजूबाजूच्या भागात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. 9 जूनला 3 तासात काही ठिकाणी 70-100 मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई, दहिसर परिसरात 9 जूनपासून रविवारी सकाळपर्यंत 30-50 मिमी पावसाची नोंद झाली.

हेही वाचा -

  1. घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case
  2. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ, 29 मे पर्यंत सुनावली कोठडी - Bhavesh Bhinde Police Custody
  3. मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये कोसळले लोखंडी होर्डिंग...; वाहनांचं झालं नुकसान, पाहा व्हिडिओ - Pune Hoarding Collapse

Last Updated : Jun 10, 2024, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.