ETV Bharat / state

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला, ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून - Satara News

Satara News : केळवली धबधब्यात तरूण बुडाल्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वर तालुक्यात (Mahabaleshwar Taluka) वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची आणखी एक घटना मंगळवारी दुपारी घडली. ट्रेकर्सच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पावसामुळं सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली.

Heavy Rain In Satara
ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 10:51 PM IST

सातारा Satara News : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. जनावरांना चरण्यासाठी घेवून गेलेला वृध्द मंगळवारी ओढ्याच्या पुरातून वाहून गेला. बबन पांडुरंग कदम (वय ६२, रा. घावरी, ता. महाबळेश्वर) असं त्यांचं नाव आहे.

ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून (ETV BHARAT Reporter)

पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत : सातारा जिल्ह्याचा पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाचगणीसह कोयनानगर, नवजा भागात सध्या पावसाचा जोर आहे. दमदार पावसामुळं नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. तर ओढे, नाल्यांना पूर आला आहे. काळोशी (ता. सातारा) येथील शेतकरी युवराज निकम यांची म्हैसही ओढ्याला आलेल्या पुरातून वाहून गेली आहे.

दरडी कोसळण्याचा धोका वाढला : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडं घाटमार्ग असल्यानं घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसामुळं रस्त्याकडेची झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी तापोळा मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पावसाचा जोर वाढल्यानं पश्चिम भागातील प्रशासकीय कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

कोयना धरणातील आवक १७ हजार क्युसेकवर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळं कोयना धरणात १७ हजार ६५० क्युसेक इतकी आवक सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत कोयनानगरमध्ये ४३ मिलीमीटर, नवजा येथे ४९ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

खंबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी : सध्या पावसाचं वातावरण आहे. त्यातच शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर मुंबईकडं जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात असलेल्या दत्त मंदिर कॉर्नरजवळ एक गाडी बंद पडली होती. रविवारी पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली होती.

हेही वाचा -

  1. पुणे-सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खंबाटकी घाटात काय आहे परिस्थिती? जाणून घ्या... - Khambatki Ghat
  2. कोयना धरणातील पाण्यानं गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद - Koyna Dam
  3. पाऊस लांबला तरी चिंता नाही; कोयना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक - Koyna Dam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.