ETV Bharat / state

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा 'धुमधडाका'; चोवीस तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद - Heavy Rain In Satara - HEAVY RAIN IN SATARA

Heavy Rain In Satara : सातारा जिल्ह्यात पावसानं मोठा धुमाकूळ घातला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर इथं 24 तासात 657 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Heavy Rain In Satara
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 9:52 AM IST

Updated : Jul 22, 2024, 10:24 AM IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा 'धुमधडाका' (Reporter)

सातारा Heavy Rain In Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं धुमाकूळ घातलाय. पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर इथं चोवीस तासात विक्रमी 657 मिलीमीटर पाऊस झालाय. संततधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून कोयना धरणात प्रतिसेकंद 70 हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Heavy Rain In Satara
धरणात सुरु असलेली आवक (Reporter)

कोयना, कृष्णा नद्या धोका पातळीकडं : संपूर्ण जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला, त्यानुसार रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाचा जोर होता, त्यामुळे नद्यांना पुराचं पाणी वाढलं आहे. सध्या नद्यांच्या पुराची धोका पातळीकडं वाटचाल सुरू झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून शेतांची तळी झाली आहेत.

Heavy Rain In Satara
पावसाचा धुमाकूळ (Reporter)

कोयना धरणातील पाणीसाठा 60 टीएमसी : संततधार पावसामुळं कोयना धरणात प्रतिसेकंद 70 हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासात 6 टीएमसीनं वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता धरणातील पाणीसाठा 60.42 टीएमसीवर पोहोचला आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून लवकरच पाणी सोडलं जावू शकतं.

Heavy Rain In Satara
नागरिकांचे हाल (Reporter)

महाबळेश्वरात सर्वाधिक 245 मिलीमीटर पावसाची नोंद : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये चोवीस तासात सर्वाधित 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरमध्ये 176 मिलीमीटर आणि नवजा इथं 236 मिलीमीटर पाऊस झालाय. पाटण तालुक्यातील मराठवाडी आणि जावली तालुक्यातील महू धरणांच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्यानं नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Heavy Rain In Satara
साताऱ्यात झालेला मुसळधार पाऊस (Reporter)

हेही वाचा :

  1. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार, 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद - Maharashtra Rain Updates
  2. Maharashtra Weather Update: रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा
  3. मुसळधार पावसाचा नागपूरला फटका : दोघांचा मृत्यू, बालक अजूनही बेपत्ता; आज मुसळधार पावसाचा इशारा, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर - Heavy Rain Hit To Nagpur

Last Updated : Jul 22, 2024, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.