ETV Bharat / state

कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, 5 हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर - Kolhapur Flood Updates

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 9:54 AM IST

Panchganga River Flood : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झालीय. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं असून पंचगंगा नदीनं देखील धोकापातळी ओलांडली आहे.

Heavy Rain in Kolhapur Increase in water level of Panchganga, migration of more than 5 thousand citizens
कोल्हापुरात पूरस्थिती (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Panchganga River Flood : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्याला यंदाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले असल्यानं पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील 5 हजार 800 नागरिकांना एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. तसंच नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून करण्यात आलंय.

कोल्हापुरात 5 हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर (ETV Bharat Reporter)

राधानगरी धरणातून 7 हजार 168 क्युसेक विसर्ग : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले असून सध्या धरणातून 7 हजार 168 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळं पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 47 फूटांवर पोहोचली आहे. तर कोल्हापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरण्याला सुरुवात झाली असून शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, जयंती नाला परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागात पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचलंय.

228 नागरिकांचं स्थलांतर : पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळं महानगरपालिकेची सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असून पूर बाधित क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प या परिसरातील 228 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. यामध्ये 56 कुटुंबातील 116 पुरुष, 112 महिला आणि 41 मुलांचा समावेश आहे. तर शुक्रवारी (26 जुलै) महापालिकेच्या निवारा केंद्रात 31 कुटुंबातील 52 पुरुष, 53 महिला आणि 14 मुलं अशा 105 नागरिकांचं स्थलांतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलं. या सर्व निवारा केंद्रातील स्थलांतरित कुटुंबांसाठी महापालिकेच्यावतीनं नाष्टा, चहा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. तसंच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीनं वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा याठिकाणी येऊन नागरिकांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधं देत आहे.

अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील 11 राज्यमार्ग 37 प्रमुखमार्ग बंद : अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली. तर अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनालाही बसला असून गोकुळ दूध संघाच्या दैनंदिन दूध संकलनाला 50 हजार लिटरचा फटका बसलाय.

पालकमंत्र्यांसह खासदार शाहू महाराज पूरग्रस्तांच्या भेटीला : शहरातील पूरपरिस्थिती गंभीर होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुतार वाडा इथं तर खासदार शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी पुलावर येऊन पूरस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा -

  1. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods
  2. कोल्हापूरला महापुराचा धोका?; पंचगंगा धोका पातळीकडे मार्गक्रमण, राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार... - Kolhapur Rain Update
  3. कोल्हापुरात पावसाची बॅटींग; पंचगंगा नदीचा 'इशारा', विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - kolhapur Rain

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.