ETV Bharat / state

विरोधकांचं संविधानावर राजकारण, एचडी कुमारस्‍वामी यांची राहुल गांधीवर टीका - HD Kumaraswamy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 5:45 PM IST

opposition politics on constitution : लोकसभेत विरोधक वारंवार संविधानावरून राजकारण करत आहेत. संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधक विनाकारण वातावरण तापवत असल्याची टीका केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केलीय. ते आज शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधत होते.

HD Kumaraswamy
एचडी कुमारस्‍वामी (Etv Bharat Reporter)

शिर्डी opposition politics on constitution : आमचे काँग्रेसचे मित्र लोकसभेत संविधानाचा मुद्दा वारंवार मांडत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत काँग्रेसचं वर्तन संविधानानुसार नाही, असं केंद्रीय अवजड उद्योग तसंच पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. ते आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच राहुल गांधी यांनी संसदेत भगवान शंकराचं चित्र दाखवलं ते चुकीचं होतं. अशा प्रकारे देवांचा राजकारणासाठी वापर करणे चुकीचं आहे, असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

एचडी कुमारस्‍वामी यांची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter)

दोन्ही खाती माझ्यासाठी आव्हानात्मक : चेन्नईतील रुग्णालयात माझ्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यावेळी 'मी' साईबाबांना प्रार्थना केली. मी आता बरा झालोय. त्यामुळं आज मी कुटुंबासह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दोन महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रीपद देऊन देशसेवा करण्याची संधी दिली आहे. दोन्ही खाती माझ्यासाठी आव्हानात्मक आहेत. मला देशातील सामान्य लोकांना रोजगार देण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही साईबाबांच्या चरणी केल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

कुमारस्वामीचा संस्थानाकडून सत्कार : केंद्रीय अवजड उद्योग तसंच पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज कुटुंबासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर कुमारस्वामी यांचं साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

'हे' वाचलंत का :

  1. ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News
  2. मनोहर भिडेंच्या प्रतीकात्मक मिश्या कापत 'जोडो मारत आंदोलन', 'त्या' वक्तव्यानं महिला कॉंग्रेसचा संताप अनावर - WOMAN CONGRESS PROTEST
  3. मुस्लिम समाजाची मतं चालतात, प्रतिनिधित्व देताना हात आखडता का? काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांचा सूर - Muslim Representation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.