Hathras Stampede : हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यामुळं 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. सत्संग कार्यक्रम करणारे भोले बाबा कोण आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भोले बाबा म्हणून ओळखले जाणारे हे बाबा चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या सत्संग कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असते.
चेंगराचेंगरी कशी झाली? भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन हाथरस येथे केलं होतं. सत्संगात मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सर्वात जास्त महिला आणि लहान मुले आहेत. या चेंगराचेंगरीत जवळपास 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सत्संगामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. सत्संगमध्ये अंदाजापेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.
The Prime Minister Shri @narendramodi Ji has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Hathras. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) July 2, 2024
कोण आहेत हे भोले बाबा? बाबा मूळचे कासगंज जिल्ह्यातील बहादुरनगर, पटियाली येथील आहे. त्यांचं नाव साकार विश्व हरी आहे. बाबा होण्यापूर्वी ते पोलिसांच्या गुप्तचर विभागात काम करायचे. पुढे त्यांनी नोकरी सोडून धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोले बाबा हे आपल्या पत्नीसह आसनावर बसून सत्संग देतात. त्यांच्या सत्संगाला हजारो लोक येतात.
#WATCH | Hathras Stampede | Uttar Pradesh DGP Prashant Kumar says, " 116 people have died in the incident. all things are under investigation and we do not want to affect the process by jumping on to conclusions. the matter will proceed based on the findings of the… pic.twitter.com/1lwFnHKEYv
— ANI (@ANI) July 2, 2024
- कोरोनाच्या काळात बाबा आले चर्चेत : कोरोनाच्या काळातही भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. त्यांनी त्यांच्या सत्संगात फक्त 50 जणांना येण्याची परवानगी मागितली होती. पण त्यांच्या सत्संगाला 50 हजारांहून अधिक लोक आले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली होती.
" we did not find baba ji...": deputy sp on hathras stampede
— ANI Digital (@ani_digital) July 2, 2024
read @ANI Story | https://t.co/NB3WQrINnm#HathrasStampede #DeputySP pic.twitter.com/YsbDdwRSU7
यूपी व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये भक्त : भोले बाबांनी एटा, आग्रा, मैनपुरी, शाहजहांपूर, हाथरस यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि हरियाणा लगतच्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची मंडळं आहेत. भोले बाबांचे बहुसंख्य भक्त गरीब वर्गातील असून लाखोंच्या संख्येने सत्संग ऐकण्यासाठी येतात. साकार विश्व हरी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणतात. परंतु त्यांचे भक्त बाबांना भगवंताचा अवतार मानतात.
#WATCH | Visuals from Ram Kutir Charitable Trust in Mainpuri district. A search operation was underway for 'Bhole Baba', who conducted a Satsang in Hathras where a stampede took place today claiming the lives of 116 people. pic.twitter.com/8u1Be55ScA
— ANI (@ANI) July 2, 2024
- सत्संगात पाणी वाटप : भोले बाबांच्या सत्संगाला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला पाण्याचं वाटप केलं जातं. हे पाणी प्यायल्यानं त्यांची समस्या दूर होते, असे बाबांचे भक्त मानतात. पटियाली तहसीलच्या बहादूर नगर गावात असलेल्या त्यांच्या आश्रमातही बाबांचा दरबार भरतो. आश्रमाबाहेर एक हातपंपही आहे. दरबाराच्या वेळी या हातपंपाचं पाणी पिण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
-
Hathras stampede: Death toll rises to 116, CM Yogi ensures thorough investigation
— ANI Digital (@ani_digital) July 2, 2024
Read @ANI Story | https://t.co/REmVhWYp9z#HathrasStampede #DeathToll #CMYogi pic.twitter.com/kTXQWG8gyD
'भोले' बाबा फरार : हातरसमध्ये सत्संगाचे आयोजन करणाऱ्या भोले बाबाचा शोध उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी नंतर यूपी पोलिसांनी भोले बाबाच्या आश्रमात शोधमोहीम राबवली, बाबा तिथं सापडला नाही. बाबा आता आश्रमातून फरार झाला आहे. असं डीएसपी सुनील कुमार सिंह म्हणाले. हातरसचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनजीत सिंग यांनी सांगितलं की, " मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण 116 लोक मरण पावले आहेत. येथे 32 मृतदेह आणण्यात आले असून त्यापैकी 19 जणांची ओळख पटली आहे."
अपघाताच्या कारणांचा शोध घ्या- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, '"हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील जीवितहानी ही अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर राबवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलिगड यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."
मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर : "हा अपघात आहे की षडयंत्र? सरकार या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन शोध घेईल," असं मुख्यमंत्री योगी म्हणाले. या अपघाताला जबाबदार कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उत्तर प्रदेश सरकारनं हातरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाथरस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा
- सत्संगात चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 116 भाविकांचा मृत्यू, मृतांमध्ये 109 महिलांसह 7 मुलांचा समावेश - Hathras Satsang stampede
- बलरामपुर में मेडिकल स्टोर संचालक ने किया महिला का ऑपरेशन, हालत गंभीर, मेडिकल स्टोर सील - Balrampur News
- आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, १८ किलो गांजा जप्त - INTERSTATE GANJA SMUGGLING RACKET