मुंबई Harshvardhan Patil News : राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपानं सत्ता मिळवलीय. राज्यसभेचं तिकीट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन केल्याची चर्चा सध्या राजकारणात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुरुवारी अचानक उमेदवारांच्या यादीत अशोक चव्हाण यांचं नाव पुढं कण्यात आलं. त्यामुळं आता हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पुनरागमन करण्याच्या भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन : काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. भाजपा त्यांना राज्यसभेसाठी संधी देणार असल्याचीही चर्चा होती. मात्र भाजपाने नुकतेच पक्षात दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळं आता हर्षवर्धन पाटील यांच्या पुनर्वसनासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. कारण राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभा तिकिट न मिळाल्यामुळं हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं. परंतू त्यांना आता एवढी मोठी पक्षानं जबाबदारी दिल्यामुळं त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरु आहे.
भाजपाकडून हर्षवर्धन पाटीलांचं पुनर्वसन? : हर्षवर्धन पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना डावलून अशोक चव्हाणांना भाजपानं राज्यसभेसाठी तिकिट दिलं. यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाकडून कोणती जबाबदारी देण्यात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना आता थेट त्यांची राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आहे. या निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांचे भाजपाकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही बोललं जातंय.
संचालकपद ते अध्यक्षपद : 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. यानंतर आता पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड झाली आहे. राज्यातील अनेक भागात सहकारी साखर संघात शरद पवार आणि काँग्रेसची सत्ता आहे. परंतु, आता 50 वर्षाच्या इतिहासात राष्ट्रीय सहकारी साखर संघामध्ये भाजपाची सत्ता आली आहे. या निवडीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली आहे.
हेही वाचा -