हैदराबाद Haribhau Bagde News: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राजस्थान, तेलंगणा आणि झारखंडसह 9 राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राज्यस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये जन्म: हरिभाऊंचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी औरंगाबादच्या चित्तेपिंपळगाव येथे झाला.१९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ मध्ये फुलंबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक जिंकली. त्याच मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूकही जिंकली. २०१४ मध्ये भाजपानं महाराष्ट्रात पहिले सरकार स्थापन केलं. तेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. ते महाराष्ट्र सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री पदही त्यांनी भूषविले आहे.
महामहिम राष्ट्रपति महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू जी द्वारा श्री ओमप्रकाश माथुर जी को सिक्किम राज्य का महामहिम राज्यपाल नियुक्त किए जाने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
— Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) July 28, 2024
मुझे दृढ़ विश्वास है कि आपके कुशल मार्गदर्शन व आपके नेतृत्व में सिक्किम प्रदेश सुशासन के पथ पर अविराम बढ़ते हुए… pic.twitter.com/fgyXtWOtDW
वयाच्या १३ व्या वर्षी संघात प्रवेश: हरिभाऊ यांना 'नाना' नावानंही ओळखंल जातं. वयाच्या १३ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. पूर्वी त्यांची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षे औरंगाबादच्या फुलंबारी येथे वर्तमानपत्रेही विकली. वृत्तपत्रं विकतानाच त्यांनी लोकांशी जनसंपर्क वाढविला. त्यांची लोकप्रियता बघून भाजपानं त्यांना १९८५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे तिकीट दिलं. तेव्हा ते पहिल्यांदाच आमदार झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत नेत्यांनाही मदत केली.
मुख्यमंत्र्यांनी ओम माथूर यांचे अभिनंदन केले: राष्ट्रपतींनी राजस्थानचे भाजपा नेते ओमप्रकाश माथूर यांच्याकडे सिक्कीमच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील पाली येथील माथूर यांनी यापूर्वी गुजरात राज्याच्या प्रभारीसह भाजपा संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. मुख्यमंत्री भजन लाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ओम माथूर यांचे अभिनंदन केले. त्यामुळे गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आता आसामऐवजी पंजाबची कमान सोपवण्यात आली आहे. कटारिया हे आतापर्यंत आसामचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. उदयपूरचे रहिवासी असलेले कटारिया हे यापूर्वी राजस्थानचे गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.
हेही वाचा