पुणे- छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हापूस आंब्याला आता नवीन ओळख मिळाली असून, जुन्नरचा हापूस आंबा आता शिवनेरी हापूस नावाने ओळखला जाणार आहे. केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन म्हणजेच 'जिओग्राफिकल इंडिकेशन'चा (जीआय टॅग) मान मिळाला असून, रत्नागिरी हापूसप्रमाणेच जुन्नरच हापूस आता शिवनेरी हापूस या नावाने ओळखला जाणार आहे.
हापूसला भौगोलिक मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू : छत्रपती शिवाजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका असून, हा तालुका राज्यातील पर्यटन तालुका असून, इथ मोठ्या प्रमाणावर टोमॅटो, भाजीपाला, कांदा, बटाटा, द्राक्षे, फळे ही पिके घेतली जातात. असं असताना गेल्या काही वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव विभागाच्या वतीने जुन्नर येथील हापूसला भौगोलिक मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालंय.
सातवाहन काळात जुन्नरमध्ये आंब्यांची लागवड : जुन्नर येथील हापूसला एक रंजक असा इतिहास असून, जुन्नर तालुक्यात आंब्यांची लागवड ही प्राचीन काळापासून होतेय. सातवाहन काळात जुन्नरमध्ये आंब्यांची लागवड केली जात होती. तत्कालीन सातवाहनांची गाथा सप्तशती या संदर्भ ग्रंथामध्ये प्राचीन जुन्नरमधील आंब्याची सविस्तर वर्णनेदेखील करण्यात आलीत. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या जुन्नरमधील महालाला आजही 'हापूस बाग' नावाने ओळखले जाते आणि असं असताना या आंब्याला ही ओळख मिळाल्याने जुन्नरच्या इतिहासात अजून भर पडलीय.
जुन्नरच्या आंब्याला शिवनेरी हापूस या नावाने ओळख : याबाबत जीआय अभ्यासक गणेश हिंगमिरे म्हणाले की, जुन्नरचा हा आंबा इतर प्रस्थापित आंब्यांपेक्षा वेगळा कसा हे शास्त्रीयदृष्ट्या पटवून देण्याचे मोठे आव्हान अभ्यासकांसमोर होते आणि असं असताना पुण्यातील आगरकर संशोधन संस्थेकडून जुन्नरच्या या हापूस आंब्यांचे 'डीएनए प्रोफायलिंग' करून त्याचं वेगळेपण सिद्ध करण्यात आलंय आणि नारायणगावच्या 'केहीके'चे कार्याध्यक्ष तात्या मेहेर यांच्या सहकार्यानं आम्ही आंब्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आणि त्यात शास्त्रीय, भौगोलिक, तांत्रिक माहितीसह ऐतिहासिक संदर्भ पुराव्यांसह जोडण्यात आले आणि येत्या 5 डिसेंबर रोजी 'जिओग्राफिकल इंडिकेशन'चा (जीआय टॅग) मान या आंब्याला मिळाला असून, आता जुन्नरच्या आंब्याला शिवनेरी हापूस या नावाने ओळख मिळणार आहे.
शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावणार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला परिसरातील पिकणारा हा आंबा आता शिवनेरी हापूस नावाने प्रसिद्ध होतोय. भौगोलिक मानांकन मिळाल्याने आता हा शिवनेरी हापूस सातासमुद्रापार जाणार आणि यातून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावणार आहेत. देशातील कृषी क्षेत्रात सर्वाधिक 'जीआय टॅग' असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर पोहोचलेत. त्यामुळे राज्यातील नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आपले उत्पादन निर्यात करण्याकरिता ताठ मानेने या निर्यातक्षेत्रात उतरता येणार आहे.
हेही वाचा :