नागपूर Green Net : नागपुरसह विदर्भात उष्णता वाढतच असल्यानं नागरिकांचे अतोनात हाल सुरु आहेत. तापमान वाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. दिवसा नागपुरच्या रस्त्यावरील वर्दळ निम्या पेक्षाही कमी झालेली असते. नागपुरच्या कडकडत्या जीवघेण्या उन्हात वाहन चालकांना वाहतूक सिग्नलवर उभं राहणं देखील अवघड होऊन बसलंय. ही परिस्थिती किमान पुढील महिनाभर कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं नागपूर महानगरपालिकेनं वाहतूक विभागाच्या मदतीनं ट्रॅफिक सिग्नलवर ग्रीन नेट शेड बांधायला सुरुवात केलेली आहे. शहरातील संविधान चौक आणि जीपीओ चौक भागात हे ग्रीन नेट शेड लावण्यात आले असून तूर्तास दुचाकी वाहनचालकांचं उन्हापासून तरी काही अंश रक्षण झालंय. नागपूर महानगरपालिकेनं वाहतूक विभागाच्या मदतीनं ट्रॅफिक सिग्नलवर ग्रीन नेट शेड बांधायला सुरुवात केलेली आहे. शहरातील संविधान चौक आणि जीपीओ चौक भागात हे ग्रीन नेट शेड लावण्यात आले असून तूर्तास दुचाकी वाहनचालकांचं उन्हापासून तरी काही अंश रक्षण झालंय.
तापमनाचा पारा 45 पार : मे महिन्यात नागपुरच्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या जवळ गेलेला होता. तर पुढं नवतपाचा धोका कायम आहे. त्यामुळं पुन्हा नागपुरकरांना कडकडत्या उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यात नागपूर महानगरपालिकेनं सुरु केलेल्या उपाययोजना दुचाकी वाहन चालकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भावर सूर्य जणू कोपल्यासारखचं चित्र आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचं तापमान जरी कमी झालं असलं तरी प्रचंड उकाडा जाणवायला लागलेला आहे. मध्यंतरी नागपुरचं तापमान 45अंशाच्या दिशेनं जात होतं. सध्या नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ जिल्हांचं तापमान 40च्या पुढं गेलंय. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर शुकशुकाट : गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झालीय. त्यामुळं रस्त्यांवरील वर्दळ कमी झालीय. रस्ते ओस पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एरवी गर्दीनं फुललेले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पश्चिम दिशेकडून येणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळं संपूर्ण विदर्भात उष्णता वाढली आहे. विशेषतः वर्धा, अकोला, अमरावती, चंद्रपूर व नागपूर इथं तापमान वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. नागपुरात उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळं तापमानात मोठी वाढ होऊन पारा हा पुन्हा 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.
मंदिरांमध्ये लागले स्पिंकलर : नागपुरात वाढत्या गर्मीपासून भक्तांचं संरक्षण व्हावं यासाठी टेकडी गणपती मंदिर परिसरात कुलिंग (स्पिंकलर) सिस्टीम बसवण्यात आलीय. बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांना अगदी आरामात बाप्पांचं दर्शन होत आहे. ग्रीन शेड सोबतचं स्प्रिंकलर बसवण्यात आले त्यामुळं मंदीर परिसरातील 4 ते 5 डिग्री पर्यंत तापमान कमी झालंय.
हेही वाचा :