ETV Bharat / state

बाबो!....तर अख्ख शिर्डी विमानतळ होईल जप्त; काय आहे नेमकी भानगड? - Shirdi International Airport - SHIRDI INTERNATIONAL AIRPORT

Shirdi International Airport : ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Shirdi Airport Tax Due) मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाख रुपयाचा कर थकीत आहे. त्यामुळं या विमानतळावर जप्तीची टांगती तलवार आहे.

Shirdi International Airport
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 9:06 AM IST

Updated : Aug 9, 2024, 11:51 AM IST

शिर्डी Shirdi International Airport : ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस (Shirdi Airport Tax Due) बजावली. वारंवार कराची मागणी करुनही शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम भरली नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 129 प्रमाणं शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्ती वारंट जारी करण्यात आलं. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा 8 कोटी 30 लाख रुपयाचा कर थकीत आहे.

बाबो! शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालमत्ता होणार जप्त (Reporter)

साडेआठ कोटी रुपये कर थकीत : "काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडं तब्बल साडेआठ कोटी रुपयांची कराची रक्कम थकीत आहे. यासाठी सातत्यानं पाठपुरावा करुनही ती रक्कम मिळत नसल्यानं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही कारवाई करण्यात आली," अशी माहिती सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी दिली.

कोणत्या नियमात दिली नोटीस? : पत्रात म्हटलं आहे की, करबाकी भरण्याबाबत सातत्यानं पत्रं दिली आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये अंतिम पत्र दिलं होतं. 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस अशा अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. तसंच ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव घेवूनही कर भरणा केलेला नाही. त्यामुळं आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 व कलम 129 अन्वये मिळकतीप्रमाणे मागणी बिलं, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत वॉरंट बजावले आहे.

या जागेचा भरला नाही कर : शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग, पेव्हर ब्लॅक एरिया, इंडियन आईल पंप, सबस्टेशन बिल्डिंग, पॉवर जेनरेटर बिल्डिंग, एटीसी टॉवर, रनवे, जीएसआर वॉटर टँक, वॉल कंपाउंड, पार्किंग रस्ता 1 आणि 2 अशा एकूण 23.50 एकर जागेची 2018 पासून कर भरणा थकीत आहे.

चार दिवसांची मुदत : "शिर्डी विमानताळकडून 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्यानं गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळं सदर थकबाकी वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 129 अन्वये जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. ग्रामपंचायतीनं सातत्यानं शिर्डी विमानतळाकडं कराच्या रकमेची मागणी केली. मात्र, त्यावर त्यांनी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतीला विमानतळास जप्तीचे वॉरंट द्यावे लागले. येणाऱया चार दिवसात कर नाही भरला तर विमानतळावरील सर्व मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत," अशी माहिती काकडी-मल्हारवाडी गावच्या सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी दिली.

हेही वाचा -

  1. अमेरिकेचे कौन्सिल जनरल माईक हँकी साई चरणी लिन, बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन - US Consul General Mike Hankey
  2. साईचरणी 43 लाखांचा सुवर्ण मुकुट दान; पहा व्हिडिओ - Golden Crown Donation

Last Updated : Aug 9, 2024, 11:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.