ETV Bharat / state

सांगलीतील व्यावसायिकाची छत्तीसगडमधील भिलाईत आत्महत्या - Sangli Businessman Suicide

Sangli Businessman Suicide : सांगली जिल्ह्यातील एका व्यावसायिकानं छत्तीसगडमधील भिलाईत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सुपेला पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या व्यावसायिकावर कर्ज असल्याचंही प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय.

BUSINESSMAN COMMITTED SUICIDE
BUSINESSMAN COMMITTED SUICIDE
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 5:34 PM IST

दुर्ग(छत्तीसगड) Sangli Businessman Suicide : छत्तीसगडमधील भिलाई येथील सुपेला पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील एका व्यावसायिकानं आत्महत्या केलीय. माहिती मिळताच सुपेला पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा व्यावसायिक सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.

हॉटेलच्या खोलीत आत्महत्या : "शुक्रवारी व्यावसायिक गोविंद पवार हे सुपेला येथील एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. तिथं त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. व्यावसायानिमित्त ते अनेकवेळा सुपेला येथे येत असतात. ते कायम या हॉटेलमध्ये राहायचे. शनिवारी सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्यानं हॉटेल व्यवस्थापकानं मास्टर चावीनं दरवाजा उघडला. त्यानंतर गोविंद पवार यांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.

गोविंद पवार हे 2 मार्चपासून हॉटेलमध्ये राहत होते. या हॉटेलमधून ते सतत त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंगचं काम करत होते. गोविंद पवार यांच्या खोलीतून जेवणाची ऑर्डर न मिळाल्यानं हॉटेल व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या रुमचा दरवाजा मास्टर चावीनं उघडण्यात आला. तेव्हा आतमध्ये गोविंद पवार यांचा मृतदेह आढळून आला - राजेश मिश्रा, टीआय, सुपेला पोलीस स्टेशन

कर्जामुळं आत्महत्या? : गोविंद पवार हे 'सेव्हन लाइफ एनर्जी' कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. जवाहर नगर भिलाई येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या मित्रानं सांगितलं की, "त्यांच्यावर खूप कर्ज आहे." दरम्यान, मृत व्यक्ती ही सांगली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत : या घटनेबाबत सुपेला पोलीस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आलं असून, आत्महत्येचा पोलीस अधिक तपास करत आहेत. होळी सणादरम्यान आत्महत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधलाय. व्यावसायिकाच्या जवळच्या लोकांशीही संपर्क साधला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कर्जाचा मुद्दाही समोर येत आहे. त्यामुळं ही आत्महत्या नेमकी कशामुळं केली याची माहिती ही पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

हे वाचलंत का :

  1. ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय विद्यार्थिनीनं केली आत्महत्या
  2. मन हेलावून टाकणारी घटना! माय-लेकरांनी संपवलं जीवन; सर्वत्र हळहळ
  3. पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही दोन लहान मुलींसह संपवलं जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.