ETV Bharat / state

शासनाची अजब व्याजमाफी! राज्यातील जिल्हा बँक अडचणीत, शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणं झालं कठीण - बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे

Farmer Loan : शासनाने आता एक नवीन निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे शेकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील रकमेवर जे काही व्याज झालं ती व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारी ही व्याजाची रक्कम जिल्हा बँकांनी त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेसोबत वसूल करून घ्यावी असे निर्देश राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना देण्यात आले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 7:41 PM IST

माहिती देताना अधिकारी

अमरावती Farmer Loan : शेतीसाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या एक लाखापर्यंतच्या कर्जावरील सहा टक्के व्याज शासनाने माफ करून ती व्याजाची रक्कम थेट बँकेकडे जमा करण्याचे धोरण आजवर राबवले. आता मात्र, शासन शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील रकमेवर जे काही व्याज झाले ती व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारी ही व्याजाची रक्कम जिल्हा बँकांनी त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेसोबत वसूल करून घ्यावी असे निर्देश दिल्यामुळे राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये गोंधळ उडाला आहे. शासनाने व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असली तरी सरकारने आमच्या कर्जावर व्याजमाफी जाहीर केली असल्याने आम्ही पैसे भरणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेतली जात असल्यामुळे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक अडचणीत सापडल्या असल्याचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी म्हटलं आहे.

असा आहे नेमका गोंधळ : राज्याच्या सहकार आयुक्तांनी (दि. 13 फेब्रुवारी 2024) ला राज्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा बैठक घेतली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जावरील तीन टक्के व्याज आणि राज्य शासनाकडून देखील तीन टक्के व्याज थेट शेतकऱ्यांच्या बचत ठेव खात्यात जमा केलं जाणार आहे, असं सांगण्यात आलं. त्यामुळे जिल्हा बँकांनी (2023-24)चे चालू पीक कर्जाची मुदतीत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज सवलत योजनेचा लाभ न देता, शेतकऱ्यांकडून सहा टक्के व्याज दराप्रमाणे व्याजाची रक्कम वसूल करावी असं सांगितलं होतं. तसंच, बँकांनी ही वसुली केली नाही तर होणाऱ्या नुकसानासाठी संबंधित बँका जबाबदार राहतील असे निर्देशही दिले होते.

आम्ही व्याज भरणार नाही : सहकार आयुक्तांच्या या निर्देशानुसार सर्व जिल्हा बँकांना शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या कर्जावर सहा टक्के व्याज वसूल करायचं आहे. आतापर्यंत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जावर माफ करण्यात आलेली व्याजाची रक्कम थेट जिल्हा बँकेकडे वळती करत असे. आता मात्र कर्जावरील व्याज माफ केल्याची घोषणा एकीकडे सरकारने केली असताना व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या विविध बँकेत असणाऱ्या बचत खात्यात जमा केली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतच्या नियमाप्रमाणे केवळ मुद्दलच बँकेत भरले. त्यामुळे जी व्याज माफी ती लक्षात घेता आम्ही व्याज भरणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामुळए जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक पूर्णतः अडचणीत येईल आणि मोठा गोंधळ निर्माण होईल असंही अभिजीत ढेपे यांचे म्हणणं आहे.

शेतकऱ्यांना कर्ज मिळणे होणार अडचणीचे : सहकार आयुक्तांनी एकीकडे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली आणि दुसरीकडे बँकांना मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम देखील वसूल करावी असं सांगितलं. शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरण्यास नकार दिला तर मोठा उद्रेक होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी व्याज न भरता केवळ त्यांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल रक्कम भरली तरी त्यांच्यावर कर्जाची थकबाकी कायम दिसेल. यामुळे त्यांना एप्रिल महिन्यात पीक कर्ज मिळणं शक्य होणार नाही, असं देखील अभिजीत ढेपे यांनी स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरण्याचं केलं आवाहन : शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेसह त्यावरील व्याज देखील यावर्षी वसूल करायचं आहे. अमरावती जिल्ह्यात 55 हजाराच्यावर नियमित कर्ज घेणारे आणि भरणारे शेतकरी आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने त्यांच्या व्याजाची रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्यांनी मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम देखील भरावी, असं आवाहन देखील अभिजीत ढेपे यांनी केलं आहे.

आठ दिवसात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा : राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शासनाच्या या निर्णयामुळे जी काही अडचण निर्माण झाली आहे त्या संदर्भात बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात निवेदन देखील सादर केलं आहे. यामुळे या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आठ दिवसात सकारात्मक निर्णय होऊ शकतो. असा सकारात्मक निर्णय झाला तर ज्या शेतकऱ्यांनी व्याजाच्या रकमेसह कर्जाची परतफेड केली, त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या व्याजाची रक्कम बँक परत करणार असं देखील अभिजीत ढेपे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

1 घराणेशाहीवरुन अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "इंडिया आघाडीतील...."

2 तुमचा पक्ष भाजपात जाणार नाही याची खात्री द्या; प्रकाश आंबेडकरांचं आव्हाड यांना प्रत्युत्तर

3 स्टॅलिननंतर ए. राजा यांचं भारतासह रामाबद्दल खळबळजनक वक्तव्य, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.