ETV Bharat / state

भाविकांसाठी आनंदाची बातमी! आजपासून साईबाबांच्या मंदिरात फुलांचा प्रसाद घेऊन जाता येणार

न्यायालयाच्या परवानगीनंतर आज अखेर याठिकाणी फुलांनी बनवलेला हार मंदिरात नेण्यास प्रत्यक्षात परवानगी देण्यात आलेली आहे.

You can carry flower offerings to Sai Baba temple
साईबाबांच्या मंदिरात फुलांचा प्रसाद घेऊन जाता येणार (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

शिर्डी- अहिल्यानगरमधील शिर्डी देवस्थानाला हजारोंच्या संख्येनं भाविक भेट देत असतात. तसेच साईबाबांच्या चरणी अनेक जण सोनं-चांदीसुद्धा दान करीत असतात. विशेष म्हणजे देवाच्या दरबारी फुलांनी बनवलेल्या हारांच्या माध्यमातून श्रद्धा अर्पित करण्याची प्रथा अन् परंपरा अनेक काळापासून चालत आलेली आहे. शिर्डीच्या साईमंदिरात देखील वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू होती. मात्र कोविड निर्बंधात मंदिरात फुलांनी बनवलेला हार प्रसाद म्हणून नेण्यास करण्यात आलेली बंदी पुढे गेली पाच वर्षांपासून सुरू होती. यावर वारंवार निदर्शनेसुद्धा झाली, न्यायालयीन लढाई देखील लढली गेली, न्यायालयाच्या परवानगीनंतर आज अखेर याठिकाणी फुलांनी बनवलेला हार मंदिरात नेण्यास प्रत्यक्षात परवानगी देण्यात आलेली आहे.

सुजय विखेंनी अर्पण केला साईंना हार : साई समाधी मंदिरातील पाच वर्षांपासूनची फुलांनी बनवलेल्या हारांवरील बंदी निवडणूक काळात न्यायालयाने अटी शर्तींवर उठवली होती. यात दर फलक लावण्याची अट ठेवण्यात आली असून, आज भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या फुलांनी बनवलेल्या हार विक्री दुकानाचा शुभारंभ करत स्वतः मंदिरात फुलांनी तयार केलेला हार नेत साई समाधीवर अर्पण केलाय. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करीत फुलांनी बनवलेला हार सुरू केल्याचं यावेळी सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं.

भाविकांच्या सोयी सुविधांसाठी फुलांचं दुकान : साई मंदिर परिसराच्या चार ते पाच ठिकाणी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी फुलांनी तयार केलेल्या हारांचे दुकाने थाटले गेलंय. याठिकाणी फुलांनी बनवलेले प्रसादांचे दर माफक ठेवण्यात आले असून, तसे दर फलकही लावण्यात आल्याने आता साईभक्तांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर फुले आणि प्रसाद साई मंदिरात नेण्यास आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळतंय.
हेही वाचा :

  1. घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश
  2. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट आव्हाड यांनी केली, धनंजय मुंडे यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.