ETV Bharat / state

अंतर्वस्त्रात लपवून आणला सोन्याचा गोळा, केरळच्या नागरिकाला नागपुरात ठोकल्या बेड्या - एअर कस्टम्स युनिट

Gold Seized At Nagpur Airport : कतार एअरलाईन्सनं नागपुरात आलेल्या केरळच्या प्रवाशानं अंतर्वस्त्रात सोन्याचा गोळा लपवून आणला होता. मात्र कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटनं या तस्कराला बेड्या ठोकल्या.

Gold Seized At Nagpur Airport
पकडण्यात आलेलं सोनं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 8:18 AM IST

नागपूर Gold Seized At Nagpur Airport : आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे सोनं तस्करीचा प्रयत्न सीमा शुल्क विभागानं हाणून पाडला आहे. सोन्याची तस्करी प्रकरणी केरळमधील तस्करास अटक करण्यात आली आहे. त्या तस्कराकडून 549 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोळा जप्त करण्यात आला. या सोन्याची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे. तस्करानं शारजा इथून सोनं तस्करी करून आणलं असून त्यानं सोनं अंतर्वस्त्राच्या आत लपवून आणलं होतं. कस्टम पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीमाशुल्क कायदा 1962 अन्वये कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

शारजातून केली होती सोन्याची तस्करी : एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला गोपनीय माहिती मिळाली होती. कतार एअरवेजच्या फ्लाइट क्र. क्यूआर 590 या विमानानं प्रवास करत असलेला प्रवासी हा सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या माहितीच्या आधारे संशयित तस्कराला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्यामुळं त्या तस्कराची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत त्याच्या अंतर्वस्त्रात 549 ग्रॅम सोन्याचा गोळा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्दे मालाची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे.

नागपूर विमानतळावर कारवाई : सीमा शुल्क विभागाकडून रात्री उशिरा याबाबत पत्रक काढून माहिती देण्यात आली. यात सीमा शुल्क विभागाचे आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) आणि एअर कस्टम्स युनिट (ACU) अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकानं ही कारवाई केलीय.

तस्कर करतात लहान विमानतळाची निवड : केरळचा निवासी असलेल्या प्रवाशानं सोन्याची तस्करी करण्यासाठी नागपूरच्या विमानतळाची निवड केली होती. परदेशातून सोन्याची तस्करी करणारे तस्कर हे आता छोट्या विमानतळाची निवड करत असल्याचं कस्टम विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. म्यानमारमधून कमरेला बांधून आणली सोन्याची 20 बिस्कीट; सांगलीतील एकासह दोन तस्करांना वाराणसीत अटक
  2. बेल्टमध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी; 1 किलो 700 ग्रॅम सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त
  3. Gold Smuggling : DRI ची मोठी कारवाई; मुंबईसह वाराणसी, नागपूर येथून 19 कोटींचं सोनं जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.