मुंबई Ghatkopar Crime : घाटकोपर पोलिसांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा फर्दाफास केला आहे. काल रविवार (11 फेब्रुवारी)रोजी सायंकाळच्या सुमारास घाटकोपर पश्चिम येथील एम.जी रोडवरील मोनालिसा ज्वेलर्स या दुकानासमोर डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क लावून दोघंजण असल्याचं दिसलं. त्याचवेळी त्यांची काहीतरी संशयितरित्या हालचाल सुरू असल्याचंही लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तीथे पाहणी केली असता त्यांना ताब्यात घेतलं. राजेश बबन कदम (वय 38 वर्षे), महावीर जोरासिंग कुमावत (वय 36 वर्षे) हापुराम (वय 22 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
बाहेर राज्यातही गुन्हा दाखल : या प्रकरणात अटक आरोपी राजेश कदम याच्या विरोधात मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात 24 गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी महावीर विरोधात तेरा गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे आरोपी हापुराम याच्या विरोधात गुजरात राज्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली आहे. आरोपी राजेश हा कांदिवली येथे राहणारा असून, अटक आरोपी महावीर आणि हापुराम हे दोघेही मीरा रोडचे राहणारे आहेत.
अंधाराचा फायदा घेत दोघजण पळाले : घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक आपल्या हद्दीत गस्त घालत असताना दीघजण अॅक्सीस बँकेच्या समोर लावलेल्या मोटारकारमध्ये लपून बसलेले दिसून आले. त्यानंतर लगेच त्या तिघांना पोलिसांनी संशय आल्यने ताब्यात घेतलं. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत दोघजण पळून गेले. ताब्यात घेतलेल्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून विनापरवाना घातक शस्त्र, चारचाकी मोटार कार आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारे हत्यारं पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत तीन लाख 21 हजार 35 रुपये इतकी आहे.
अनेक गुन्हे केल्याचा संशय : घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप देवार्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी घरफोडी, दरोडा, जबरी चोरी सारखे अनेक गुन्हे केले असल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी या करत आहेत.
हेही वाचा :
1 "दाढी हलकी समजू नका, काडी फिरवली तर लंका जळून जाईन"; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर तोफ
2 पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; पुण्यातील दोन वकील जागीच ठार
3 मोठी बातमी! कतारच्या ताब्यातील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका