ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू, दुर्घटनेचा एसआयटी करणार तपास - ghatkopar hoarding case - GHATKOPAR HOARDING CASE

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीमध्ये 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे या दुर्घटनेत मृतांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. मृतांची संख्या 17 इतकी झाली आहे.

ghatkopar hoarding case
घाटकोपर दुर्घटना (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 9:55 AM IST

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा नाहक जीव गेला. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या एसआयटीच्या टीममध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 7 चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत.

एसआयटीनं मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या निवासस्थानी तपास करून तेथून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांची विविध बँकांमध्ये एकूण 7 बँक खाती आहेत. भिंडे यांना होर्डिंगचे कंत्राट कसे मिळाले? त्यांनी किती कमाई केली याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटीनं भावेश भिंडे यांच्या कंपनीतील काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.

काही कागदपत्रे जप्त- गुन्हे शाखेच्या कक्ष 7 चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे एसआयटी प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 कोटी रुपये लागतात. त्यामुळे आरोपी भावेश भिंडे यांच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे. होर्डिंग लावण्याची परवानगी कोणी दिली? प्रमाणपत्रे कोणी दिली? याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले. तसेच मुलुंड येथील भावेश भिंडे याच्या इगो मीडिया प्रा. लि. च्या कार्यालयातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. एसआयटीचे पथक मंगळवारी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथे पोहोचले. घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग व्यवस्थित लावण्यात आले होते की नाही? हे शोधण्यासाठी पोलिसांना व्हीजेटीआयची मदत घ्यायची आहे. एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती नवी माहिती बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

जखमी रिक्षाचालकाचा मृत्यू- दुर्घटनेत जखमी झालेले रिक्षा चालक राजू सोनवणे यांना केईएम रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी 19 मे रोजी रात्री बारा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढून एकूण संख्या 17 इतकी झाली आहे. राजू सोनवणे हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्याची पत्नी घरगुती काम करते. त्यांच्या मुलाला नोकरी नाही. त्यांनी कर्ज घेऊन बदलापूर येथे घर घेतले होते. मात्र, मृत सोनवणे यांचे कुटुंबीय रमाबाई आंबेडकर नगर येथे राहत असल्याचे त्यांचे नातेवाईक अश्वजित सोनवणे यांनी सांगितले.

काय घडली होती दुर्घटना? घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भावेश भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली आहे. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. आरोपी भावेश भिंडे यांच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग उभारले होते. हे होर्डिंग 13 मे रोजी धुळीच्या वादळात पेट्रोल पंपावर कोसळले होते. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान 304, 338, 337 आणि 34 अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा-

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : आता मुंबई गुन्हे शाखा करणार भावेश भिंडेचा 'कसून' तपास, प्रकरण वर्ग - Ghatkopar Hoarding Collapse
  2. घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला उदयपूरमध्ये ठोकल्या बेड्या - Ghatkopar Incident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.