ETV Bharat / state

विशेष मुलाखत : पाकिस्तानातून मायदेशी परतलेली गीता सध्या काय करते? जाणून घ्या तिचं 'स्वप्न' - Geeta from Pakistan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 11:36 AM IST

Geeta Returned India From Pakistan : तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांनी नऊ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली दिव्यांग गीता सध्या काय करते? पाकिस्तानात असतानाचं तिचं आयुष्य कसं होतं आणि आता भारतात राहून तिला कसं वाटतंय? हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'कडून गीताची विशेष मुलाखत घेण्यात आलीय. गीता दिव्यांग असल्यानं तिचे प्रशिक्षक प्रशांत ढवळे यांच्या माध्यमातून तिच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी तिच्याशी बातचीत केली.

geeta who returned India from Pakistan passed 8th now wants to become a teacher
पाकिस्तानातून मायदेशी परतलेली गीता (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Geeta Returned India From Pakistan : 2015 मध्ये पाकिस्तानमधून भारतात परतलेली गीता सर्वांना आठवत असेल. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीताला तब्बल पंधरा वर्षांनी मायदेशी परत आणलं. ती गीता आता आठवी पास झाली असून तिनं शिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्यासारख्या दिव्यांग मुलांना नवजीवन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गीतानं 'ईटीव्ही भारत'च्या खास मुलाखतीत सांगितलं.

पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या गीताची मुलाखत (ETV Bharat Reporter)

वयाच्या सहाव्या वर्षी चुकून गेली पाकिस्तानला : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील दिव्यांग असलेली सहा वर्षाची एक चिमुकली चुकून पाकिस्तानला जाणाऱ्या रेल्वेत बसली आणि लाहोरमध्ये पोहोचली. तेथील पोलिसांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती उत्तरं देऊ शकली नाही. त्यानंतर तिला एका खासगी संस्थेत ठेवण्यात आलं. त्यावेळी तिथं असलेल्या कृष्णाच्या फोटोला तिनं नमस्कार केल्यानंतर ती हिंदू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावरुन पाकिस्तानच्या सामाजिक संस्थेनं तिचं नाव 'गीता' ठेवलं. जवळपास पंधरा वर्ष ती तिथंच राहिली. त्यानंतर तिच्याविषयी माहिती समोर आल्यानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रयत्न करुन गीताला देशात परत आणलं.

अनेकांनी केला आई-वडील असल्याचा दावा : 2015 मध्ये गीता भारतात परतली. त्यानंतर इंदूर येथील आनंद सर्विस सोसायटी आणि इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तिच्या आई वडिलांचा तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी अनेकांनी ही आमचीच मुलगी असल्याचा दावा केला. मात्र गीतानं त्यांना ओळखलं नाही, उलट मोठा संभ्रम निर्माण झाला. तिनं केलेल्या वर्णनानुसार परभणी जिल्ह्यातील ती असल्याची खात्री पटली. तेथील एका कुटुंबानं त्यांची मुलगी त्याच साली हरवल्याचं सांगितलं. त्यानंतर गीतानं देखील आईला ओळखलं. वडिलांचा मृत्यू झाल्याच्या कालांतरानं गीताच्या आईनं दुसरा विवाह केला होता. त्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरात वास्तव्यास आली. त्यांची शहानिशा करुन गीताला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं.

गीताला व्हायचंय शिक्षक : गीतानं मध्यप्रदेश राज्य मुक्त विद्यालय शिक्षा बोर्डमध्ये आठवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. तर आता पुढील शिक्षण ती संभाजीनगरातील प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटर इथं पूर्ण करत आहे. देशात आल्यावर नागरिकत्व असलेलं प्रमाणपत्र मिळालं. मात्र, आधार कार्ड आणि अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेण्यास तिला सात वर्ष लागली. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागल्याचं प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटरचे प्रमुख शलमोन डोंगरे यांनी सांगितलं. ती सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेसह संगणकाचंही प्रशिक्षण घेत आहे. सध्या शिकत असलेल्या संस्थेतच शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा गीतानं यावेळी व्यक्त केली. अनेक दिव्यांग गरीब गरजू मुलं समाजात आहेत. अशा मुलांना शिकवण्याची माझी इच्छा असल्याचं तिनं सांगितलं. तसंच "पाकिस्तानमध्ये ज्या संस्थेत मी राहिले तिथं असलेल्या लहान मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेण्याचं काम माझ्याकडं होतं. त्यामुळं मी लहान मुलांना सांभाळू शकते. इतकंच नाही, तर त्यांना चांगलं शिकवू शकते, म्हणूनच मला शिक्षक व्हायला आवडेल," असंही गीतानं 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं.

भारतात चांगलं वातावरण : "पाकिस्तानमध्ये गेल्यावर मला शिक्षण घेता आलं नाही. तिथं मुलींच्या शिक्षणावर बंधन आहेत. त्यात मला त्यांची भाषा कळत नव्हती. मी एकटीच दिव्यांग असल्यानं सामान्य मुलांसोबत मला शिक्षण घेता येत नव्हतं. मात्र, भारतात आल्यावर खूप चांगलं वाटलं. भारतात मुलींसाठी खूप चांगलं वातावरण असून मला खूप शिकायचंय. आता मी नववी वर्गात शिक्षण घेत असून शिकत असलेल्या संस्थेत देखील चांगलं वातावरण आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर माझ्यासारख्या मुलांसाठी मला काम करायला आवडेल," असं गीतानं सांगितलं. तसंच "एकदा चुकून पाकिस्तानला गेले, मात्र आता तिकडं जायचं नाही. पण तिकडं ज्या संस्थेत मी होते, तिथल्या प्रमुख असलेल्या मॅडमची आठवण येते," असंही गीता यावेळी म्हणाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.