ETV Bharat / state

गौतम अदानींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, भेटीचं कारण काय? - GAUTAM ADANI NEWS

उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Gautam Adani Meets CM Devendra Fadnavis
गौतम अदानी देवेंद्र फडणवीस भेट (IANS/ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 1:39 PM IST

Updated : Dec 10, 2024, 3:31 PM IST

मुंबई : अदानी उद्योग समुहाचे संस्थापक तथा उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर गौतम अदानी यांनी प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प अदानी ग्रुपकडून केला जात आहे. या प्रकल्पाला शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसनं कडाडून विरोध केला आहे. दुसरीकडं संसदेतदेखील अदानींच्या प्रकरणावरून विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या भेटीबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

अदानींवरील मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात आरोप करण्यात आले. हे आरोप अदानी यांनी फेटाळले आहेत. असं असलं तरी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानींवरील आरोपांची चौकशी करून अदानी यांच्या अटकेची मागणी केली. या मुद्द्यावरून संसदेत रोज गदारोळ होत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस तथा खासदार प्रियांका गांधी-वड्रा या मंगळवारी संसदेत पोहोचल्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक बॅग होती. त्या बॅगवर 'मोदी-अदानी भाई-भाई', असं लिहिलं होतं. प्रियांका गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "आम्ही अदानींचा मुद्दा संसदेत का उपस्थित करू नये. आम्ही पहिल्यांदाच संसदेत निवडून आलो आहोत. या अधिवेशनात आम्ही अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी होताना पाहिलं नाही. संसदेचं कामकाज सुरू नसल्यामुळं चर्चेत सहभागी होता येत नाही".

विरोधकांवर भाजपाचा निशाणा : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात सोमवारी मोदी-अदानी यांचे मुखवटे घातलेल्या दोन लोकांशी संवाद साधला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे हे कृत्य लोकशाहीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

अदानी देणार आहेत व्हीआयपींना निमंत्रण : गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नापूर्वी उदयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्री वेडिंग सोहळा पार पडणार आहे. गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचा प्री-वेडिंग सोहळा 10 आणि 11 डिसेंबरला होणार आहे. यासाठी उदयपूरमधील 3 आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. या विवाह सोहळ्यात देशातील 50 हून अधिक व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी 12 मार्चमध्ये जीत अदानी यांनी हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी दिवा शाहसोबत साखरपुडा केलेला आहे.

हेही वाचा-

  1. नीट पेपर फुटीपासून कंगनाच्या कानशिलात लगावण्यापर्यंत 2024 मध्ये भारतात घडले सर्वात मोठे 12 वाद, नेमके कोणते? जाणून घ्या
  2. "मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानींच्या अटकेची राहुल गांधींची मागणी योग्यच", नाना पटोले कडाडले

Last Updated : Dec 10, 2024, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.