ETV Bharat / state

काय सांगता! एकाच मिनिटात कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनचं तिकीट बुकिंग फुल्ल; चाकरमानी संतप्त - Ganpati Special Trains

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 7:48 AM IST

Ganpati Special Trains : यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी आहे. गणपती स्पेशल गाड्यांची बुकिंग अवघ्या काही मिनिटातच फुल्ल होणं हे आता दरवर्षीचं झालंय. मागील वर्षे देखील असाच प्रकार घडला होता. अनेकांनी प्रयत्न करून देखील त्यांचे नाव प्रतिक्षा यादीतच राहिले. अनेकांनी बनावट आयआरसीटीसी अकाउंट तयार करून आरक्षण केल्याचा प्रकार समोर आला होता. तर यंदाही असाच प्रकार घडला का? याबाबतची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केलीय.

Ganpati Special Trains
गणपती स्पेशल रेल्वे (File Photo)

मुंबई Ganpati Special Trains : गणपती उत्सवासाठी (Ganpati Festival 2024) चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षी मध्य आणि कोकण रेल्वेकडून 'गणपती विशेष गाड्या' चालवल्या जातात. मात्र, रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या या विशेष गाड्यांचं बुकिंग पहिल्या पाच मिनिटांतच फुल्ल होतात. आता हा प्रकार दरवर्षीचा झालाय. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय. यावर्षी देखील रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यापासून काही मिनिटातच रिग्रेट असा मेसेज येऊ लागला आहे. त्यामुळं रेल्वेच्या या दरवर्षीच्या कारभारावर कोकणवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सव काळात 202 विशेष गाड्या : गणपतीसाठी रेल्वे स्थानकावर कोकणवासीयांची मोठी गर्दी असते. त्यामुळं गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या चालवणार असून, पश्चिम रेल्वेकडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे आणखी 50 गाड्या चालवण्याच्या विचारात आहे. रेल्वेच्या सर्वच गाड्यांचं बुकिंग फुल्ल दाखवत असल्यानं चाकरमान्यांना खासगी बसनं जावं लागत आहे. पण, हे खासगी बसचालक अव्वाच्यासव्वा भाडे आकारत असल्यानं सामान्य लोकांना हे भाडे परवडणारे कसे? असा प्रश्न सध्या कोकणवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

तिकीट बुकिंग फुल्ल : यावर्षी 7 सप्टेंबर रोजी कोकणवासीयांच्या लाडक्या गणपतीचं आगमन होणार आहे. त्यामुळं आतापासून तिकीट काढण्याची घाई चाकरमानी करत आहेत. मध्य रेल्वेच्या 202 गणपती विशेष गाड्याचं आरक्षण 28 जुलै म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाले होते. पण, अवघ्या एकाच मिनिटात तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याचा मेसेज प्रवाशांना आला. त्यामुळं अनेकांनी पुढच्या किंवा मागील तारखेचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला त्यांना रिग्रेट असा मेसेज आला. त्यामुळं कोकणवासीयांमध्ये सध्या रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप आहे.

चाकरमान्यांचा झाला हिरमोड : मध्य रेल्वेची गाडी नंबर 01167 लोकमान्य टिळक टर्मीनस ते कुडाळ 'गणपती स्पेशल ट्रेन' 4, 5 आणि 6 सप्टेंबरला रिग्रेट दाखवत आहे. काही प्रवाशांनी गाडी नंबर 01185 लोकमान्य टिळक टर्मीनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीचं 4 आणि 7 सप्टेंबरचं तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. काहीनी गाडी नंबर 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या गणपती स्पेशल गाडीचं तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना रिग्रेट असा मेसेज आला. रेल्वेच्या या कारभारामुळं चाकरमान्यांचा हिरमोड झाला.

गाडीचं बुकिंग करताना काळाबाजार? : गणपती स्पेशल गाड्यांची बुकिंग अवघ्या काही मिनिटातच फुल्ल होणं हे आता दरवर्षीचं झालंय. मागील वर्षे देखील असाच प्रकार घडला होता. अनेकांनी प्रयत्न करून देखील त्यांचे नाव प्रतिक्षा यादीतच राहिले. कोकणवासीयांना आपलीशी वाटणारी गाडी म्हणजे कोकणकन्या. या गाडीचं बुकिंग मागील वर्षी अवघ्या दीड मिनिटात फुल्ल झालं आणि वेटिंग लिस्ट हजाराच्यांवर गेली. त्यामुळं या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मध्य रेल्वेने या प्रकरणाची चौकशी केली आणि यात काळाबाजार झाल्याचं उघड झालं होतं. अनेकांनी बनावट आयआरसीटीसी अकाउंट तयार करून आरक्षण केल्याचा प्रकार समोर आला होता. या वर्षी देखील असाच प्रकार घडल्यानं या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी, कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.

गाड्याची डब्यांची संख्या 24 करावी : पश्चिम रेल्वेवरून वसई मार्गे आणि पुण्यावरून कल्याण मार्गे कोकणासाठी 'गणपती विशेष गाड्या' चालवणं गरजेचं आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाने अति गर्दीच्या दिवशी म्हणजेच गणपतीचं आगमन होते त्याच्या एक-दोन दिवसांपूर्वी आणि विसर्जनाच्या वेळेस अतिरिक गणपती स्पेशल गाड्या चालव्यात. खेड ते मुंबई दरम्यान विशेष गाड्याची संख्या वाढविणे गरजेचं आहे. सोबतच रेल्वे प्रशासनाने 202 गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. त्या गाड्या फक्त 20 डब्यांच्या आहेत. त्यामुळं रेल्वेने गणपती विशेष गाड्या आणि नियमितपणे धावणाऱ्या गाड्याची डब्यांची संख्या 24 करावी अशी मागणी, कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केलीय.

गणेशोत्सव काळातील कोकण रेल्वेच्या गाड्यांचं बुकिंग अद्याप फुल्ल झालं नाही. आमच्या माहितीनुसार अद्याप 30 ते 32 टक्के जागा रिक्त आहेत. - डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

गणपती विशेष गाड्यांना एलएचबी डबे जोडावेत : उन्हाळा सुट्ट्यांचा विचार केला तर मध्य रेल्वे दरवर्षी इतर राज्यांसाठी मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडते. या सर्व उन्हाळी विशेष गाड्या एलएचबी डब्याचा (नवे कोच) असतात. मात्र, कोकणाकरीता गणपती विशेष गाड्याना आयसीएफचे डबे (जुने कोच) जोडण्यात येतात. दोन दोन डब्यातील मुख्य फरक म्हाजने आयसीएफपेक्षा एलएचबी डब्यांची प्रवासी क्षमता अधिक असते. वांद्रे-कुडाळ गणपती विशेष गाडी वगळता तर इतर सर्व गणपती विशेष गाडयांना आयसीएफ डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळं रेल्वेने कोकणात चालविण्यात येणाऱ्या सर्व गणपती विशेष गाड्यांना एलएचबी डबे जोडावेत अशी मागणी देखील अक्षय महापदी यांनी केली आहे.

वंदे भारत ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी : मुंबई ते मडगांव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे देखील गणेशोत्सव काळातील आरक्षण फुल्ल झालं आहे. त्यामुळं आणखी विशेष गाड्या सोडण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या 'वंदे भारत ट्रेन' 8 डब्याची धावत आहे. गणेशोत्सव तोंडावर रेल्वे बोर्डाने वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या 8 वरून 16 करावी अशी मागणी प्रवाशांनी केलीय.

वंदे भारत ट्रेनची क्षमता 95 टक्के : रेल्वे डब्यांची संख्या वाढवल्यास आसन क्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक क्षमतेने प्रवास करता येईल. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या इतर वंदे भारत गाड्यांपैकी मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेन सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. दिवसागणिक प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, प्रति महिना या गाड्यांमधून 30 ते 35 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबई-मडगाव वंदे भारत सुरुवातीला 91.44 ते 93.11 टक्के क्षमतेने धावत होती. मात्र, सध्या ही ट्रेन 95 टक्के क्षमतेने धावत आहे. प्रवासी आणि पर्यटकाचा वाढता प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला मिळत आहे. त्यात गणपतीत प्रवाशांची संख्या लक्षात घेता या गाडीच्या डब्यांची संख्या 8 वरून 16 करावी अशी मागणी देखील प्रवासी संघटनांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. कोकणवासियांसाठी खुशखबर; गणेशोत्सवाकरिता रेल्वे चालवणार 202 स्पेशल ट्रेन, कधीपासून करता येणार आरक्षण? - Ganpati Special Trains
  2. गणपती बप्पा निघाले विदेशात : अमेरिका, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलियात गणेश मूर्तींना मागणी - Ganeshotsav 2024
  3. गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिरात विराजमान होणार 'दगडूशेठ'चे पार्वतीनंदन - Dagadusheth Ganesha Installed

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.