ETV Bharat / state

धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case - THANE GANG RAPE CASE

Gang Rape On Married Women : ठाण्यातून अत्यंत खळबळजनक घटना समोर आलीय. एका विवाहितेवर तिचा सासरा, दीर अन् मामेभावानं अत्याचार केला. त्यानंतर तिच्यावर सपासप कोयत्यानं वार केला. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

gang rape on married women in thane, Three accused arrested
ठाण्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 10:22 PM IST

Updated : Sep 8, 2024, 10:31 PM IST

ठाणे Gang Rape On Married Women : एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तिघंही नराधम पीडितेचे नातेवाईक असून यामध्ये पन्नास वर्षीय सासरा, 22 वर्षीय दीर आणि सोळा वर्षीय अल्पवयीन मामेभावाचा समावेश असल्याचं उघडकीस आलंय. या तिघांनीही पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केलं. सध्या पीडितेवर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळं ठाण्यात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

डीवायएसपी जगदीश शिंदे (ETV Bharat Reporter)
नराधमांना अटक : याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोन नराधमांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर सोळा वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडीच्या बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर : पोलीस सूत्रांनं दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता कल्याण तालुक्यातील एका गावात वीट भट्टीवर आपल्या पतीसह मजुरी करून त्याच विट भट्टीवर एका झोपडीत राहत होती. 6 सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास तिन्ही नराधम आरोपी पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीनं बळजबरी करत बलात्कार केला. या घटनेला विरोध करताच या तिघांनीही पीडितेला तिला बेदम मारहाण करत तिच्यावर कोयत्यानं वार केले. या घटनेनंतर नराधम घटनास्थळावरून फरार झाले होते. तर पीडित महिलेच्या नजीक राहणाऱ्या नातेवाईकांनी तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. गुन्हा दाखल : पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी सासरा, दीर आणि अल्पवयीन मामेभावावर अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आज (8 सप्टेंबर) अटक केली. तर सोळा वर्षीय अल्पवयीन मामेभावाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडीच्या बाल सुधार गृहात करण्यात आल्याची माहिती डीवायएसपी जगदीश शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम करत आहेत. हेही वाचा -
  1. उत्तराखंड हादरले! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 कंडक्टरसह 2 चालकांकडून सामूहिक बलात्कार - Dehradun Gang Rape Case
  2. अग्निवीर जवानाचा मित्रांसह अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी उत्तराखंडमधून ठोकल्या बेड्या - Agniveer Soldier Gangraped A Girl
  3. भिक्षा मागणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Thane Crime News

Last Updated : Sep 8, 2024, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.