ETV Bharat / state

लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी 'उमेद' अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवलं. या व्यवसायातून महिलांनी कोट्यवधींची उलाढाल केली. फक्त पापड, लोणचं किंवा घर उपयोगी वस्तू न बनवता आता गणेश मूर्ती देखील या महिला बनवत आहेत.

Ganeshotsav 2024
गणपती मूर्ती तयार करून केली कोट्यवधींची उलाढाल (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 5:55 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ganeshotsav 2024 : महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक घरगुती उद्योग केले जातात. त्यातून या महिलांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळवणं शक्य होतं. मात्र, शहरातील काही बचत गटांनी पुढाकार घेत चक्क बाप्पाची मूर्ती साकारून, त्या स्वस्त दरात ग्राहकांपर्यंत घेऊन येण्याचं काम केलं. यातून कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली. मागील वर्षी गाव- खेड्यात सुरू झालेला हा व्यवसाय जिल्हा परिषदेच्या मदतीनं आता शहरात येऊन पोहचला. मागील वर्षी जवळपास चार कोटींची उलाढाल करणारा हा व्यवसाय यंदा जवळपास सात कोटींचा व्यवसाय करेल, असा विश्वास बचत गटातील महिलांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया देताना बचतगट महिला वैशाली चव्हाण आणि सचिन सोनवणे (ETV BHARAT Reporter)

महिला बचत गटानं तयार केल्या गणेश मूर्ती : जिल्हा परिषद मैदान येथे महिला बचत गटाने पहिल्यांदाच बाप्पाच्या शाडू मातीच्या मूर्तींचं विक्री केंद्र सुरू केलं. प्रत्येक वेळी बचत गट म्हटलं की, लोणचं, पापड, कपडे असं काही उत्पादन तयार करण्याच्या महिलांचा समूह असं चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र, या महिलांनी आपल्यातील कला ओळखून स्वतः गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. 183 बचत गटांनी यात सहभाग घेतला, ज्यामध्ये 170 बचत गट स्वतः शाडू मातीच्या मूर्ती साकारत आहेत. तर 13 बचत गट मूर्ती विकत घेऊन व्यवसायात उतरले आहेत.

बचत गटांसाठी मोफत जागा : 'उमेद' संस्थेच्या माध्यमातून गावपातळी ते शहरापर्यंत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. मागील वर्षी 4 कोटींची उलाढाल बचत गटानं केली. यावर्षी 183 ठिकाणी मूर्ती विक्री केंद्र सुरू करण्यात आले. त्यातील 12 दुकाने शहरातील जिल्हा परिषद मैदान येथे उभारण्यात आले आहेत. या बचत गटांसाठी मोफत जागा देण्यात आली. यंदा बाप्पाच्या आगमनापूर्वीच साडे तीन कोटींची उलाढाल झाली असून सहा ते सात कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा विश्वास, 'उमेद'चे जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे यांनी व्यक्त केला.

ग्राहकांना होतोय फायदा : बचत गटाच्या महिलांनी मूर्ती साकारून स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा परिषद आणि 'उमेद' या संस्थेनं त्यांना मदत केली. मूर्तिकार थेट ग्राहकांपर्यंत मूर्ती घेऊन येत असल्यानं ती स्वस्तात विक्री केली जात आहे. इतकंच नाही तर ग्राहकांना दहा टक्के सूट देण्यात येत असल्यानं त्याचा फायदा होत आहे.

ग्राहकांची पसंती : जिल्हा परिषद मैदानावर मोफत दुकानं उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी यांची विक्री केली जाते. गाव, खेड्यापासून तर शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातोय. यंदा बचत गटांनी तयार केलेल्या 2 लाख 51 हजार 485 मूर्ती बाजारात आणण्यात आल्या. त्यांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याची माहिती महिला बचत गटाच्या सदस्या वैशाली चव्हाण यांनी दिली.

इतर साहित्यातून देखील निर्माण केला व्यवसाय : दरवर्षी गणेश मूर्ती विक्री करून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसाय निर्मिती केली जाते. मूर्ती विक्रीचे दुकान ज्या ठिकाणी लावले जाते, त्याच ठिकाणी पूजेचे इतर साहित्य देखील विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ग्राहकांना एकाच ठिकाणी बाप्पाची मूर्ती आणि साहित्य हे माफक दरात मिळत आहे. बचत गटाला त्याचा फायदा होऊन मोठी उलाढाल त्यानिमित्तानं निर्माण केली जाते. तर या निमित्तानं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 'लखपती दीदी योजने'च्या अनुषंगानं बचत गटातील महिला लखपती होत आहेत, अशी प्रतिक्रिया 'उमेद'चे जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. लाइव्ह राज्यभरात लाडक्या बाप्पाचं आगमन; भाविकांचा उत्साह शिगेला, देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब केली गणरायाची प्राणप्रतिष्ठा - Ganeshotsav 2024 Live Update
  2. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या गजरात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आगमन - Ganeshotsav 2024
  3. गणेशोत्सव 2024 : मुंबईकरांनो गणपती विसर्जनाला जाताना घ्या काळजी ; महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी - BMC Guidelines For Ganesh Immersion

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.