ETV Bharat / state

नितीन गडकरींच्या निवासस्थानी एक नाही तर दोन बाप्पा झाले विराजमान... - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : राज्यभरात विविध ठिकाणी गणरायाचं आगमन झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी एक नाही तर दोन गणरायाची स्थापना झाली.

Ganeshotsav 2024
नितीन गडकरींची निवासस्थानी बाप्पाचं आगमन (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 9:21 PM IST

नागपूर Ganeshotsav 2024 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari House) यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झालं आहे. नागपूर येथील त्याच्या घरी विघ्नहर्ता गणरायाचं जल्लोषापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह संपूर्ण कुटुंबीने गणेशाचं स्वागत केलं. नेहमी प्रमाणे अत्यंत साधेपणाने नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पाची प्रतिस्थापना करण्यात आली. महत्वाचे म्हणजे यावेळी नितीन गडकरी यांच्या घरी एक नाही तर दोन बाप्पा विराजमान झालेत.

लहान मुलांनी केली बाप्पाची स्थापना : गडकरी यांच्या कुटुंबातील लहान मुलांनी वेगळ्या खोलीत गणपती बाप्पाची स्थापना केलीय. त्यामागील कारण देखील तसचं खास आहे. लहान मुलांमध्ये गणेशोत्सवाचे संस्कार व्हावे यासाठी घरातील सर्व लहान मुलांना पंचरत्न गणपती बसवण्याची विशेष परवानगी देण्यात आली.

अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी बाप्पाचं आगमन : 'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, ढोल-ताशा पथकांचा निनाद, पारंपरिक पेहरावातील उत्साही कार्यकर्ते अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पुण्यासह जगभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेते तसंच सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी आज बाप्पाचं आगमन झालं आहे.

हेही वाचा -

  1. लाइव्ह लाडके बाप्पा विराजमान! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी दोन बाप्पा विराजमान - Ganeshotsav 2024 Live Update
  2. लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024
  3. अंबानगरीत गणरायाचं थाटात आगमन; 'नाळ'मधील चैतूनं गणेशभक्तांना केलं 'हे' आवाहन - Ganeshotsav 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.