ETV Bharat / state

दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी; फुलांच्या दरात वाढ, झेंडू 110 रुपयांवर तर जास्वंदचा दर भिडला गगनाला - Ganeshotsav 2024

Ganeshotsav 2024 : महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि फुलांसाठी गणेश भक्तांनी मुंबईतील दादर परिसरातील फुल बाजारात तुफान गर्दी केली.

Ganeshotsav 2024
दादर फुल मार्केट (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 11:48 AM IST

मुंबई Ganeshotsav 2024 : आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली.

दादर फुल मार्केटमध्ये लोकांची गर्दी (Source - ETV Bharat Reporter)

बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारं साहित्य, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, नैवेद्य, फळं, फुलं आणि बाप्पाच्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी गणेश भक्तांनी मुंबईतील दादर येथील फुल मार्केटमध्ये तोबा गर्दी केलीय. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढल्यानं दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अवकाळी पावसाचा फटका : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका फुलांच्या शेतीला बसलाय. मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू आहे. दादर फुल मार्केटलाही पावसाचा फटका बसलाय. विक्रीसाठी आणलेली फुलं मोठ्या प्रमाणात भिजली असल्यानं सडून जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर दुप्पट ते पाच पट वाढले आहेत. यातच प्लॅस्टिकच्या फुलांची वाढलेली खरेदी यामुळं देखील मार्केटमधील व्यापारी त्रस्त आहेत.

बाजारात कोणत्या फुलाला किती दर? : बाजारात सध्या गुलछडी सगळ्यात महाग आहे. प्रति किलो गुलछडी खरेदी करण्यासाठी 1000 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्यानं गुलछडी महाग झाली आहे. झेंडू 40 वरुन 110 रुपये, गुलाब 80 वरुन 110 रुपये, गुलछडी 200 वरुन 1000 रुपये, शेवंती 100 वरुन 400 रुपये, जास्वंद शेकडा 50 वरुन 500 रुपये, दुर्वा जूडी 10 वरुन 30 रुपये, कापरी 50 वरुन 120 रुपये, अष्टर 120 वरुन 200 रुपये दर आहे.

हेही वाचा

  1. लाइव्ह गणेशोत्सव 2024: लाडक्या बाप्पाचं आज होणार आगमन; भाविकांचा उत्साह शिगेला, सिद्धिविनायकाची सकाळीच पार पडली आरती - Ganeshotsav 2024 Live Update
  2. शाडू मातीपेक्षा 'मातीचा बाप्पा' चांगला, 1661 जणांनी बनवली बाप्पांची मातीची मूर्ती, मनीषा चौधरी राबवतात मोहीम - Ganeshotsav 2024
  3. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; बंदोबस्तासाठी 15 हजार पोलीस तैनात - Ganeshotsav 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.