ETV Bharat / state

गाव करेल ते राव काय करेल, कोल्हापुरातल्या 'या' गावानं जपलीय गणेशोत्सवाची अनोखी परंपरा - Ganeshotsav 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 9:21 PM IST

Ganeshotsav 2024 : राज्याला पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श देणाऱ्या, सोनाळी गावात (Sonali Village) गेल्या 76 वर्षापासून रंगविरहित शाडू मातीच्या गणेश मूर्ती प्रत्येकाच्याच घरी बसवल्या जातात. तर येथील सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्तीही रंगविरहित शाडू मातीच्या आहेत. डॉल्बी मुक्ती मिरवणूक आणि मूर्तीदान, निर्माल्य दानाची चळवळ गावात राबवली जाते.

Ganeshotsav 2024
शाडूची गणेशाची मूर्ती (ETV BHARATReporter)

कोल्हापूर Ganeshotsav 2024 : "गाव करेल ते राव काय करेल" या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोनाळी गावात (Sonali Village) आला आहे. गेली 76 वर्षे गावात घरगुती आणि सार्वजनिक गणेशाची पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती बसवण्याची परंपरा गावकऱ्यांनी आजही कायम ठेवली. वाडवडिलांनी घालून दिलेल्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचं अनुकरण 21 व्या शतकातली तरुण पिढी आजही करत आहे. पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता उत्सव साजरे करता येतात, असा संदेश या गावानं राज्याला दिला आहे.

76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती वापरण्याचं आवाहन गेल्या काही वर्षांपासून केलं जातय. जरी घरगुती गणपती शाडूच्या मातीपासून बनवलेले असेल तरी सार्वजनिक मंडळे मात्र पीओपी पासून तयार केलेल्या गणेशमूर्ती आणतात. यामुळं नदी, ओढे, तलाव यांच्यात गणेश विसर्जनानंतर प्रदूषण होतं. परंतु कोल्हापुरातील एक असं गाव आहे, तिथे गेल्या 76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे.

कोल्हापुरात शाडू मातीच्या गणेशमूर्तींची पूजा (ETV BHARATReporter)

मूर्तीदान आणि निर्माल्य दानाची चळवळ : घरोघरी रंगविरहित शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची प्रथा करवीर तालुक्यातील सोनाळी गावात गेल्या 76 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. तसंच या गावातील तरुण मंडळांच्या गणेश मूर्तीही रंगविरहित शाडू मातीच्याच असतात. संपूर्ण महाराष्ट्राला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आदर्श देणाऱ्या या गावात मिरवणूकही साऊंड सिस्टीम न वापरता काढली जाते. तसंच मूर्तीदान आणि निर्माल्य दानाची चळवळही गावात राबविली जाते हे विशेष.

गावात रंगीत गणपती नाही : सोनाळी गावात हनुमान आणि मरगूबाई देवदेवतांची मंदिरे असून मुख्य ग्रामदैवत 'धाकेश्वर' आहे. ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसवलेला चालत नाही अशी येथील आख्यायिका आहे. त्यामुळं गावात आजही शाडूच्या मूर्तीच आणल्या जातात.

बलुतेदारी पद्धतीने गणेश मूर्ती पुरविल्या जातात : सोनाळी गावच्या शेजारील म्हालसवडे गावातील कुंभार समाजाकडून आजही बलुतेदारी पद्धतीने संपूर्ण सोनाळी गावाला शाडू मातीच्या गणेश मूर्ती पुरवल्या जातात. मूर्तीचा मोबदला म्हणून सुगीच्या दिवसात कुंभार बांधव धान्य स्वीकारतात. गेल्या काही वर्षात सोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपूर्ण राज्याला आदर्श देणारा ठरला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सोनाळी गावचा आदर्श आता संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे असाच आहे.

हेही वाचा -

  1. माहेरी आलेल्या कोळीवाड्यातील गौरीला माशांचा नैवेद्य; 107 वर्षांची परंपरा आजही कायम - jyeshtha Gauri Pujan
  2. आतापर्यंतच्या सर्वात लहान सार्वजनिक बाप्पाची स्थापना, 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद - Ganeshotsav 2024
  3. तीन दिवसाच्या गौराईसाठी साकारला 100 वर्षांपूर्वीचा साई मंदिर देखावा, पाहा व्हिडिओ - jyeshtha Gauri Pujan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.