ETV Bharat / state

कोल्हापुरातील दोन मित्रांची कमाल, कार्यशाळेतून घडवले गणपती कलाकार - Ganeshotsav 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 7:02 PM IST

Kolhapur Ganesh Murti Making Workshop : पर्यावरणाची हानी न होऊ देता गणेशोत्सव साजरा करण्यात यावा या उद्देशानं कोल्हापुरातील अमन शेख आणि गौरव काईंगडे हे दोन्ही मित्र गेल्या 6 वर्षांपासून इको-फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा घेत आहेत.

Aman Shaikh and Gaurav Kaingde from Kolhapur conducting eco-friendly Ganpati making workshops for past 6 years
इको-फ्रेंडली गणपती कार्यशाळा (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Kolhapur Ganesh Murti Making Workshop : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दोन मित्रांनी घरोघरी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती विराजमान व्हावी यासाठी गणपती मूर्ती बनवण्याच्या विशेष कार्यशाळा घेतल्या. गेल्या सहा वर्षांपासून ते गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेत असून या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरसह राज्याबाहेरही अनेक कलाकार घडवले आहेत. या दोन मित्रांच्या कार्यशाळेतून घडवलेल्या मूर्ती आता घराघरात विराजमान होणार आहेत. पर्यावरणपूरक मातीच्या आणि सुबक नक्षीकाम केलेल्या इको-फ्रेंडली गणपती बाप्पाला कोल्हापूरकरांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती : कोल्हापुरातील टेराकोटा पॉटरी आर्टिस्ट असलेले अमन शेख आणि गौरव काईंगडे या दोन तरुण मित्रांनी एकत्र येत पर्यावरण पूरक गणेशमूर्ती सोप्या पद्धतीनं कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न केले. मातीपासून गणेश मूर्ती बनवल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करून यासंदर्भातील कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांपासून ते दोघंही शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या कॉलेज तरुण तरुणींना मातीपासून मूर्ती बनवायचं आणि त्यावर सुबक नक्षीकाम, रंगकाम करण्याचं प्रशिक्षण देत आहेत. या दोघांचं काम पाहून कलेमध्ये स्वारस्य असणाऱ्यांनीही या कार्यशाळेत भाग घेऊन घरात बसूनच आकर्षक मूर्ती बनवण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळं कोल्हापूरातील अनेक घरांमध्ये आता पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विराजमान होत आहेत. पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता उत्सव साजरे करता येतात, हेच यातून सिद्ध होत असल्याची प्रतिक्रिया गणेशमूर्ती कलाकार अमन शेख आणि गौरव काईंगडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.

आत्तापर्यंत सुमारे 3 हजार जणांना प्रशिक्षण : गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापुरातील हे दोघं तरुण अनेक ठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी यापूर्वी कोणतच प्रशिक्षण नसतानाही गौरव आणि अमन यांच्या मार्गदर्शनामुळं सुबक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवत आहेत. अमन शेख आणि गौरव काईंगडे आत्तापर्यंत सुमारे 3 हजार जणांना आपल्या कार्यशाळेतून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलंय.

हेही वाचा -

  1. गणेशोत्सव 2024; गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील 'हे' महत्वाचे रस्ते राहणार बंद, भाविकांना घ्यावी खबरदारी - Ganeshotsav 2024
  2. बाप्पांसाठी वेचलं आयुष्य, घरी केला हजारांहून जास्त मूर्तींचा संग्रह; जाणून घ्या ठाण्यातील गणेश भक्ताची अनोखी कहानी - Ganeshotsav 2024
  3. 'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; नवसाला पावणाऱ्या गणपतीचं विसर्जन करतात संकष्टीला - Ganeshotsav 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.