ETV Bharat / state

पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'स्त्री शक्ती'चा जागर; 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण अन् महाआरती - Ganeshotsav 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 9:12 AM IST

Updated : Sep 8, 2024, 12:51 PM IST

Ganeshotsav 2024 : 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून लाडक्या बाप्पाला नमन केलं. ॠषी पंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेनं भारलेल्या वातावरणात महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.

Ganeshotsav 2024
35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण (Source - ETV Bharat)

पुणे Ganeshotsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः... मोरया, मोरया...च्या जयघोषानं तब्बल 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केलं. ॠषी पंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेनं भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्तानं पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोषात अथर्वशीर्षासोबत महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती (Source - ETV Bharat Reporter)

अथर्वशीर्ष पठणाचा वर्ल्ड रेकॉर्ड : कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डनं घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध ठिकाणच्या महिलांचा सहभाग : दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणासाठी गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीनं झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचं हे 39वं वर्ष होतं.

यावेळी बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, "बुद्धी हीच खरी शक्ती आहे. सर्व महिला आज गणरायाकडं बुद्धी मागायला मोठ्या संख्येनं आल्याचं चित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येक कार्यामागं बुद्धी आहे आणि एक विचार असतो. आपण जे काही करतो, ते बुद्धीपूर्वक करायला हवं. आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळं महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी."

हेही वाचा

  1. गणेशोत्सव 2024; नवसाला पावणारा नागपूरचा "टेकडी गणपती", 350 वर्षांचा आहे इतिहास - Ganeshotsav 2024
  2. ठाण्यात टिळक आळीत बाप्पा झाले विराजमान; कारागृहातून सुटल्यानंतर टिळकांनी केलं होतं भाषण - Ganesh Chaturthi 2024
  3. लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024

Last Updated : Sep 8, 2024, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.