मुंबई Gajanan Kirtikar : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटबाबात ठरलं असून, अद्यापर्यंत महायुतीत काही जागांवरुन एकमत होत नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघात महायुतीतून कोण उमेदवार असावा यावर अंतिम निर्णय झालेला नाही. येथून कोण उमेदवार असणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तर, महायुतीतून अनेक नावं समोर येत आहेत. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे देखील येथून आपल्या मुलाच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर, येथे महायुतीकडून कुठला उमेदवार असावा हे सांगण्याचा आपला नैतिक अधिकार नसल्याचं खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.
उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला नाही : अमोल किर्तीकर यांच्यावरील कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपामुळे वडील खासदार गजानन किर्तीकर व्यथित झाल्याचं दिसलं. "अमोलवरील आरोप हे बिनबुडाचे आहेत. तसंच, अमोल कीर्तिकर याला ईडी चौकशीत नाहक त्रास दिला जात आहे," असं गजानन किर्तीकर म्हणाले. "उत्तम-पश्चिम मतदार संघातून माझा मुलगा अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत आहे, पण येथे शिवसेनेचा उमेदवार कोणता असावा हे ठरवण्याचा नैतिक अधिकार मला नाही. उमेदवार ठरवण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील," असं गजानन किर्तीकर म्हणाले.
त्यांच्या बेडूक उड्या : अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपमांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आघाडी धर्म पाळला नाही, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. अमोल किर्तीकर यांची खिचडी घोटाळाप्रकरणी चौकशी चालू आहे, अशा उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही. त्यांच्यासाठी काम करणार नाही, असं निरुपमांनी म्हटल्यावर काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करून संजय निरुपमांना पक्षातून बडतर्फ केलं. त्यामुळं येथे संजय निरुपम उमेदवार असतील का? किंवा त्यांना उमेदवारी मिळल्यास त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न किर्तीकरांना विचारल्यास "याबाबत मी आताच सांगणार नाही. ज्या राजकारणात बेडूक उड्या असतात, त्या बेडूक उड्या संजय निरुपमांच्या आहेत, त्यामुळं मी फारसं त्यांना महत्व देत नाही," असं ते म्हणाले.
हे मी आताच सांगणार नाही : संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांना उमेदवारी दिली तर आपण प्रचार करणार का? असं विचारले असता, "जर मुंबई उत्तर-पश्चिममधून संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करायचा की नाही याबाबत मी आताच काही सांगणार नाही. परंतु, संजय निरुपम हे बिहारमधून मुंबईत नोकरीच्या शोधात आले होते. सुरुवातीला सामना पेपरमध्ये कामाले होते. बाळासाहेबांच्या जवळ वावरू लागले. त्यामुळं त्यांना खासदारकी मिळाली आणि त्यांची पाऊले राजकारणाकडे पडू लागली. निरुपम हे वेगळ्या विचारधारेचे आणि अपुरी पत्रकारिता केलेला माणूस आहे," अशी टीका गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांच्यावर केली.
हेही वाचा :