ETV Bharat / state

मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात बहरणार फळझाडे; 'से ट्रीज' चा उपक्रम - Say Trees Foundation - SAY TREES FOUNDATION

Say Trees Foundation : मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या आदिवासी बांधवांचा 'शेती' हा मुख्य व्यवसाय आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी (Tribal Farmers) पारंपारिक पिकांसोबतच फळझाडांची देखील लागवड करून आर्थिक प्रगती साधावी यासाठी 'से ट्रीज' या पर्यावरण क्षेत्रातील सेवाभावी संस्थेच्या वतीनं एक उपक्रम राबवण्यात आला आहे.

Amravati News
शेतातील बहरणार फळझाडं (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 6:39 PM IST

अमरावती Say Trees Foundation : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात आता आंबा, चिकू, संत्री, फणस, पेरू, आवळा, सिताफळ, अंजीर, नारळ, संत्रा, मोसंबी, जांभूळ अशी फळझाडे बहरणार आहेत. 'से ट्रीज' या पर्यावरण क्षेत्रातील सेवाभावी संस्थेच्या वतीनं आदिवासी शेतकऱ्यांना (Tribal Farmers) ही फळझाडे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

900 शेतकऱ्यांना लाभ : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबतच फळपिकांचंही उत्पन्न वाढावं या उद्देशानं बंगलोर येथील 'से ट्रीज' या सेवाभावी संस्थेच्या वतीनं गत दीड वर्षांपासून सर्वेक्षण, शेतकरी मेळावे, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत एकूण 900 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळझाडं लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या शेतकऱ्यांना आता या फळझाडांचं वितरण केलं जात आहे.

प्रतिक्रिया देताना यश बलसागर आणि निखिल बंधारे (ETV BHARAT Reporter)

शेतकऱ्यांचा मेळावा केला आयोजित : 'से ट्रीज' च्या वतीनं मेळघाटात सहा महिन्यांपूर्वी चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे विविध गावातील आदिवासी शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करून, त्यांना फळझाडं लागवडीमुळं भविष्यात उत्पन्न कसं वाढेल आणि फळझाडांचं महत्त्व या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. यानंतर एकूण 900 आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात देखील झाडे लावण्यासंदर्भात पुढाकार घेण्याबाबत सहमती दर्शविली.

एक लाख 75 हजार फळझाडांचं वाटप : या शेतकऱ्यांना फळझाडांची लागवड कशी करावी, कोणत्या फळझाडासाठी किती खड्डा खोदावा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. एका शेतकऱ्याला त्यांच्याकडं असणाऱ्या शेतजमिनीप्रमाणे 30 ते 300 फळझाडे सध्या वितरित केली जात आहेत. 900 शेतकऱ्यांकरता एकूण 1 लाख 75 हजार फळझाडांचं वितरण मेळघाटातील धामणगाव गढी या गावातून केलं जात आहे. आतापर्यंत एक लाख रोपांचं वाटप झालं असून येत्या काही दिवसात 75 हजार रोपांचं वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती, सेटरीज संस्थेचे सहाय्यक क्षेत्र संचालक यश बालसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

2007 मध्ये संस्थेची स्थापना : 'से ट्रीज' या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेची स्थापना 2007 मध्ये बंगलोरला झाली. कपिल शर्मा हे या संस्थेचे संचालक आहेत. शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करावी या उद्देशाने ही संस्था देशभर काम करते. मेळघाटात गत दोन अडीच वर्षांपासून या संस्थेचं काम सुरू असून मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात फळझाडं लावावी आणि चांगलं उत्पन्न घ्यावं हा संस्थेचा खरा उद्देश असल्याची माहिती संस्थेचे मेळघाटातील क्षेत्र संचालक ओम गिरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

फळझाडे लागवडीसाठी पुढाकार : यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांना एक लाख 75 हजार फळझाडांचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी देखील फळझाडं लागवडीसाठी पुढाकार दर्शवला. काही शेतकऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आंब्याची झाडे लावली आणि आज त्यांचं चांगलं उत्पन्न होत आहे. आमझरी येथील शेतकऱ्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आता मेळघाटात विविध भागात आदिवासी बांधव फळझाडांची लागवड करून या भागात फळझाडे वाढवण्यास सोबतच स्वतःचं उत्पन्न देखील वाढवतील असा विश्वास ओम गिरी यांनी व्यक्त केला.

संस्थेची ही जबाबदारी : मेघाटातील या आदिवासी बांधवांना फळझाडं देऊन आमचं काम पूर्ण होत नाही. आता शेतकऱ्यांनी ती झाडं जगवली पाहिजेत. त्यांचा आर्थिक फायदा झाला पाहिजे. यासाठी वर्षभर आमच्या संस्थेचे कर्मचारी मेळघाटात असणाऱ्या दुर्गम भागात जाऊन या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधला जाईल. फळझाडे लागवडीसह त्याचं व्यवस्थापन, छाटणी कशी करावी यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं जाणार असल्याची माहिती, ओम गिरी यांनी दिली.

हेही वाचा -

  1. एका छताखाली 451 गणरायांचं दर्शन; अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाचा अनोखा उपक्रम, पाहा व्हिडिओ... - Ganeshotsav 2024
  2. अंबानगरीत गणरायाचं थाटात आगमन; 'नाळ'मधील चैतूनं गणेशभक्तांना केलं 'हे' आवाहन - Ganeshotsav 2024
  3. मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.